महाड नगर परिषदेच्या लाडवली डम्पिंग ग्राउंड च्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक!थेट नगरपरिषदेत नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब!

महाड (प्रतिनिधी) महाड नगर परिषदेच्या लाडवली येथील कचराडम्पिंग ग्राउंड मुळे नागरिक त्रस्त झाल्याने अखेर नागरिकांनी नगरपालिकेवर धडक देऊन नगराध्यक्ष सुनील कविस्कर व मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे याबाबत डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी केली

महाड शहरात गोळा होणारा कचरा हा थेट महाड पासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लाडवली येथील डम्पिंग ग्राउंड मध्ये नेऊन या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते तसेच या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीनेप्रक्रिया केले जात असल्याचे नगर परिषदेचे म्हणणे आहे
महाड शहरातून गोळा होणारा रोजचा हजारो टन कचरा हा लाडवली येथील डम्पिंग ग्राउंड वर नेला जातो मात्र या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढवली गुंडाळे देऊळकोंड व या परिसरातील २१ वाड्यांना मोठ्या प्रमाणावर या कचऱ्याच्या दुर्गंधीचा मागील आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणावर शोषणाचा व आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण झाल्याची तक्रार या परिसरातल्या ग्रामस्थांनी आज महाड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे मांडली
महाड नगरपरिषदेच्या लाडवली येथील कचरा डम्पिंग ग्राउंड मुळे या परिसरात असणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे अनेक विद्यार्थ्यांवर या कचरा डेपोमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच अनेक वृद्ध व्यक्ती व महिलांना देखील या कचरा समस्यांचा शारीरिक परिणाम जाणवत असल्याच्या तक्रारी यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी मांडल्या

येत्या आठ दिवसात हा कचरा डेपो इथून बंद हावा अशी मागणी देखील त्यांनी केली

महाड नगर परिषदेच्या लाडवली येथील कचरा डेपोमुळे मोठ्या प्रमाणावर गोडाळे येथील नदी प्रदूषित झाली आहे या प्रदूषित नदीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी दुर्गंधीयुक्त झाले असून जनावरांना तसेच महिला वर्गांना देखील ग्रामस्थांना या पाण्याचा उपयोग होत नसल्याने आजूबाजूच्या विहिरी देखील प्रदूषित झाल्या आहेत याबाबत महाड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या समोर नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचला त्यावर नगर परिषदेमार्फत फवारणी चालू असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले मात्र ग्रामस्थ आक्रमक झाले व त्यांनी या कचऱ्या डेपो बाबत फवारणी वगैरे काही नको तुम्ही कचरा डेपोच बंद करा अशी मागणी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली त्यानंतर ग्रामस्थ थेट नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या कक्षात जाऊन मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा केली मात्र ग्रामस्थ आक्रमक झाले असून नगर परिषदेच्या या कचरा डेपोमुळे होणारे वायू प्रदूषण लक्षात घेता तातडीने निर्णय घेऊन येत्या आठ दिवसात हा प्रकल्प येथून बंद करा अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली
यावेळी लाडवली येथील ग्रामस्थांनी नगराध्यक्ष यांची त्यांच्या कक्षात भेट घेतली असतामहाडचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी लाडवली कचरा डेपो मुळे होणाऱ्या दुर्गंधी बाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महाड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *