सोहेल खानच्या घरीच राहतात त्याची दोन्ही मुलं, पालकांच्या घटस्फोटानंतर आईकडे जात नाहीत, कारण…

सोहेल खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर सीमा सजदेह तिचा धाकटा मुलगा योहानला घेऊन वरळीला राहायला गेली. तिचं वांद्रेमध्ये सोहेल खानच्या घराजवळ होतं, मात्र तिने तिथे न राहता वरळीला जायचं ठरवलं. तिचा हा निर्णय तिची जवळची मैत्रीण महीप कपूरला आवडला नाही. आता ‘फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलीवूड वाइव्ह्ज’मध्ये सीमाने तिच्या या निर्णयाबद्दल खेद व्यक्त केला. तसेच योहान तिच्याबरोबर नाही तर वांद्रेमध्ये वडील सोहेलबरोबर जास्त राहतो असंही तिने सांगितलं. शोमध्ये महीप कपूरने नीलम कोठारीकडे तक्रार केली की सीमाने वांद्रे सोडण्याचा निर्णय घेतला. महीप म्हणाली, “ती वांद्र्यातून शिफ्ट झाली, मी तिला नको म्हटलं होतं. ‘तुझे मित्र इथे आहेत, तुझं काम इथे आहे, निर्वाण अमेरिकेतून परत आला आहे, तोही इथे राहतो, तुझी मुलं इथं आहेत,’ असं मी तिला म्हणाले. तिने वांद्रेपासून इतक्या दूर जाण्याची गरज नव्हती.” या सीरिजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सीमाचा मोठा मुलगा निर्वाणने आईच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिलं. “वांद्र्यात बाबाच्या घरापासून तुझं घर जवळ होतं, रस्ता ओलांडला की तिथे सहज यायला जमायचं. आम्ही तुला रोज भेटू शकत होतो,” असं निर्वाण म्हणाला. त्यावर सीमाने त्याला उत्तर दिलं. “मला वाटलं की या इमारतीत आधीपेक्षा जास्त लोक आहेत, लहान मुलं आहेत, त्यामुळे योहानसाठी बरं राहील. योहानकडे तिथे करण्यासारखं खूप नव्हतं, त्या तुलनेत इथे त्याच्यासाठी बऱ्याच अॅक्टिव्हिटी आहेत. म्हणून घटस्फोटानंतर मी वरळीला जाण्याचा निर्णय घेतला. योहान आणि माझ्यासाठी ही एक नवीन सुरुवात होती. मला वाटले की ते त्याच्यासाठी चांगले होईल. पण, मी विचार केला होता तसं काहीच घडलं नाही आणि तो जास्त वेळ वांद्र्यात घालवतो,” असं सीमा म्हणाली.

निर्वाण पुढे म्हणाला, “त्याचे सर्व मित्र वांद्र्यात आहेत. तो वांद्र्यात वाढलाय.” त्यावर सीमा म्हणाली हो त्यामुळे मला सारखं त्याला वांद्र्याला सोडायला जावं लागतं. मग निर्वाण म्हणाला, “आता तू वरळीला गेली आहे, त्यामुळे आमच्यासाठी वांद्र्याहून वरळी करणं कठीण झालं आहे. तुला खूपदा आम्ही भेटत नाही. आम्ही त्या घरात वाढलो. त्या घरात योहानचा जन्म झाला. त्या घरात आठवणी आहेत. त्या घरात आम्हाला कंफर्टेबल वाटतं.” सीमाने त्याला विचारलं, “मग आता काय? मी परत यावं असं तुला वाटतंय का?” त्यावर लगेच निर्वाणने होकार दिला. सीमा व सोहेलचा २०२२ मध्ये घटस्फोट झाला. या शोमध्ये तिने बॉयफ्रेंडशी ओळख करून दिली. १९९८ मध्ये सोहेल खानबरोबर पळून जाण्यापूर्वी ज्याच्याशी तिने साखरपुडा मोडला होता, त्याच विक्रम आहुजाला ती आता डेट करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *