मुंबई- चांदिवली विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. १६१ अंतर्गत टिळकनगर, साकिनाका येथे नवक्रांती युवा मित्र मंडळाच्या पुढाकारातून जिर्णोद्धार करण्यात आलेल्या भव्य व सुसज्ज श्री हनुमान मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिवसेना चांदिवली विधानसभा प्रभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली.
या सोहळ्याचे आयोजन आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून व त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री गणपती मंदिर ते हनुमान मंदिर, टिळकनगर असा भव्य कलश मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या मिरवणुकीत स्थानिक भाविक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानंतर सकाळी ११.३० वाजता गणेश व भोलेनाथ हौसिंग सोसायटी, अनिस कंपाऊंड, टिळकनगर, साकिनाका येथे जिर्णोद्धारित श्री हनुमान मंदिरात प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण विधी वैदिक मंत्रोच्चारात पार पडला.