राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोकण विभागाला नवे आयुक्त, सांगलीला नवे जिल्हाधिकारी

मुंबई : राज्य शासनाने प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. २७ मार्च २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार कोकण विभाग, अमरावती विभाग तसेच विविध महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल प्रखेर अग्रवाल यांची कोकण विभागीय आयुक्त, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर महिला व बालविकास आयुक्त, पुणे नयना गुंडे यांची अमरावती विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MAIDC), मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुल रेखावर यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर एम. देवेंद्र सिंग यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत संयुक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांची सांगली जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रियमवदा म्हाडाळकर यांची धाराशिव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या बदल्यांमुळे राज्यातील विविध विभागांमध्ये प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *