मिरा-भाईंदरमध्ये महानगर गॅस समस्यांवर संयुक्त बैठक; तातडीच्या उपाययोजनांवर भर

मिरा-भाईंदर : प्रभाग क्र. ०७ मधील नागरिकांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा मिळण्यात येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या दालनात संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या समस्या जाणून घेत तातडीने उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
भाईंदर पश्चिम राम मंदिर रोड, दामले गल्ली, म्हात्रे लेन तसेच परिसरातील अनेक नागरिकांना अद्याप गॅस कनेक्शन उपलब्ध न झाल्याने दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण होत असल्याची बाब बैठकीत समोर आली. यावर संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस सचिन पवार (उप-अभियंता), अल्ताफ पांचाळ (सिनियर मॅनेजर), सुजित सिन्हा (मॅनेजर), शुभम सोनी (असिस्टंट मॅनेजर), अ‍ॅड. रवी व्यास (नगरसेवक), आभा अमेय पाटील (नगरसेविका), डॉ. भव्य पिपलिया शाह (नगरसेविका) तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी संबंधित विभागांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना लवकरात लवकर गॅस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, या बैठकीनंतर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *