महाड (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड च्या प्रवेशद्वाराजवळच महावितरणच्या उघड्या विद्युत वाहिन्यांमुळे पर्यटकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असून एखाद्या पर्यटकांचा जीव गेल्यानंतरच महावितरणचे अधिकारी जागे होणार का असा सवाल रायगड किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांकडून व्यक्त केला जात आहे
छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड वर हजारो शिवभक्त रोपवे व पायरी मार्गाने किल्ले रायगड वर जात असतात याच किल्ले रायगड वर जाणाऱ्या वाय सेक्शन पासून चित्तदरवाजापर्यंत सुमारे ५०० मीटर अंतरापर्यंत रस्त्याला थेटूनच महावितरणच्या विद्युत प्रवाहाच्या वाहिन्या उघड्या असल्याचे चित्र स्पष्टपणे पाहण्यास मिळते
किल्ले रायगडावर चित्त दरवाजाकडे जाताना विद्युत प्रवाहाच्या उघड्या असणाऱ्या वाहिन्यांमुळे जर चुकून या ठिकाणी वणवा लागला तर विद्युत वाहिन्या जळून नष्ट होतील तसेच या विद्युत वाहिन्या उघड्या स्वरूपात असल्याने जर एखाद्या पर्यटकाला चुकून विजेचा धक्का बसल्यास त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो या ठिकाणी मागील वर्षी वणव्यामुळे या ठिकाणच्या विद्युत वाहिन्या जळून नष्ट झाल्या होत्या मात्र एवढे असून देखील मागील वर्षभरापासून या विद्युत प्रवाहाच्या वाहिन्या उघड्या स्वरूपातच या ठिकाणी आहेत त्यामुळे आंधळे कुत्र पीठ खाते असा महावितरणच्या कारभार असल्याचे उघड झाले आहे
याबाबत विद्युत वितरण विभागाच्या पाचाड येथील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता सध्या मार्च महिना असल्याने विद्युत थकबाकी वसुलीचे काम चालू आहे एप्रिल महिन्यात शिवपुण्यतिथीचा कार्यक्रम झाल्यानंतर या उघड्या स्वरूपातील विद्युत वाहिन्या भूमिगत स्वरूपात जमिनीमध्ये टाकण्याचे काम चालू होईल त्यासाठी आवश्यक असणारी विद्युत केबल प्राप्त झाली आहे मात्र असे असले तरी किल्ले रायगड चा भाग हा जंगलातील असल्याने चुकून जंगलाला वणवा लागल्यास व त्यातून एखादी गंभीर घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा असावा या निमित्ताने उपस्थित होत आहे