महाड शहरात ३ वर्षात ९६३ कुत्र्यांच्या नसबंदीवर १३ लक्ष रुपये खर्चून देखील कुत्र्यांची संख्या वाढली!

महाड (प्रतिनिधी) महाड शहरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना या कुत्र्यांच्या नसबंदीवर ३ वर्षात तेरा लक्ष रुपये खर्चूनही केवळ ९६३ कुत्र्यांची नसबंदी झाली असून मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र महाड शहरात पाहण्यास मिळत आहे महाड शहरात मागील तीन वर्षात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता या कुत्र्यांच्या नसबंदीवर महाड नगर परिषदेमार्फत सन २०२४-२०२५ व सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात १३,६९,२०० रुपये खर्च करून केवळ ९६३ कुत्र्यांची नसबंदी झाली आहे महाड शहरात कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता कुत्र्यांची नसबंदी करण्याचे काम करुणा वाईल्ड लाईफ असोसिएशन, व डॉक्टर सोपान जगताप वन्यजीव अभ्यासक या दोन संस्थेमार्फत करण्यात आले महाड शहरात मोकाट कुत्र्यांना सकाळच्या वेळेस बिस्किटे चालण्याचे काम अनेक मंडळी करीत आहे त्यामुळे देखील कुत्र्यांची संख्या वाढल्याची चर्चा शहरातील अनेक नागरिकांकडून चर्चिली जात आहे त्यातच मोकाट उपशाळलेल्या कुत्र्यांमुळे लहान मुलासहित वृद्ध व्यक्तींना देखील चावल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र कुत्रा चावल्यानंतर शासकीय रुग्णालयात रेबीज ची लस उपलब्ध नसल्याने अनेकांना खाजगी रुग्णालयात जाऊन खर्चिक उपचार देखील घ्यावे लागत आहेत मात्र कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी देखील नागरिकांकडून केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *