महाड( प्रतिनिधी) महाड वरून पुण्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक९६५ डी.डी.राजेवाडी ते वरंधा भोर महाड. या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी व नूतनीकरणासाठी रायगड जिल्हा हद्दीमध्ये वरंध ते पारमाची व वाघजाईपर्यंत रुंदीकरण करण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी करोडो रुपये खर्चून देखील अवघड वळणे व भूस्खलनाचा धोका कायम राहणार असल्याचे चित्र या रुंदीकरणाच्या कामानिमित्त अधोरेखित होत आहे
रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या महाड पंढरपूर या महामार्गाच्या नूतनीकरणाचे व वारंवार पावसाळ्यात होणारे भूस्खलन रोखण्यासाठी वरंधा व पारमाची भागातील धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत व अवघड वळणे काढून रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम चालू असले तरी या कामाच्या दर्जाबाबत व पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या भूस्खलना करिता घाटातील डोंगराला ड्रिलिंग करून दगडाला ड्रिल मारून आत मधी लोखंडी रोड टाकून त्यावर जाळी बसवून सिमेंटचे गिलोटीन करण्याचे काम वरंधा घाटातील वाघजाई पर्यंत चालू आहे
महाड भोर पंढरपूर रस्त्यावरील वरंधा घाटातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईडला संरक्षक भिंत बांधण्याचे काम केले. मात्र हे काम करीत असताना अनेक ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण केले मात्र छोटी वळणे या ठिकाणी सरळ रस्ता करता येऊ शकत होता त्या ठिकाणी न करता जैसे थे पूर्वीचा रस्ता होता तसाच कायम ठेवत त्याची किरकोळ डाकूजी करून नूतनीकरण केली आहे मात्र पूर्वी ज्या दोन ठिकाणी अवघड वळण होती व ज्या ठिकाणावरून एसटी बस घाटात चढताना व घाटातून उतरताना चालकाला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत होती तीच परिस्थिती आज देखील कायम असल्याचे चित्र या रुंदीकरणानंतर व घाटात बांधलेल्या संरक्षक भिंतीच्या कामानंतर पाहण्यास मिळते
महाड भोर पंढरपूर रस्त्यावरील वरंधा घाटात करण्यात आलेल्या रुंदीकरणानंतर हा घाट अवजड वाहनांसाठी व एसटी बससाठी वळणाच्या ठिकाणी धोकादायक असल्याचे चित्र घाटातून उतरताना घाट चढताना पाहण्यास मिळते म्हणजे करोडो रुपये खर्चून देखील या घाटातील अवघड वळणे काढण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने का केले नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे