सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून शासन क्लस्टर डेव्हलपमेंटचा विचार करणार का? आ. प्रविण दरेकरांकडून सभागृहात प्रश्न उपस्थित

 

मुंबई- सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून शासन क्लस्टर डेव्हलपमेंटचा विचार करणार का?, असाप्रश्न सभागृहात प्रश्नोत्तराच्या चर्चेवेळी भाजपा गटनेते आ.प्रविण दरेकर यांनी शासनाकडे उपस्थित केला.

 

सभागृहात सदस्य निरंजन डावखरे यांनी म्हाडा अंतर्गत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाबाबतचा प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सहभागी होत आ. दरेकर यांनी म्हटले की, अभ्यूदय नगरला प्रत्येक घरात १-१ पार्किंग देताहेत. तशा प्रकारचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचे क्लस्टर डेव्हलपमेंटला प्राधान्य आहे. नवे प्रकल्प होताहेत त्यात सर्व सुविधा असतात. परंतु जे जूने रहिवाशी असतात त्यांच्याकरिता या सुविधा नसतात. क्लस्टरच्या माध्यमातून मूळ रहिवाशांनाही त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत,त्या संदर्भात सरकार भूमिका घेणार का? तसेच स्वयंपुनर्विकासात क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावे अशी मुख्यमंत्र्यांची भावना आहे. ८-१० इमारतींचे क्लस्टर डेव्हलपमेंट केले तर त्यांना सर्व सुविधा देता येतील. तशा प्रकारचा विचार शासन सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून क्लस्टर करण्याचा करणार का? असा सवालही दरेकर यांनी केला. दरेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पंकज भोयर यांनी, दरेकरांनी दिलेली माहिती मुख्यमंत्री व वरिष्ठाना पोचवून चर्चा करून त्यांच्या निर्देशानुसार कार्यवाही केली जाईल. तसेच दरेकरांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजनही केले जाईल, असे सकारात्मक उत्तर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *