राज्यासह मुंबईतील रुग्णालयांत जनेरिक औषधं उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेणार का? भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा सवाल

मुंबई- राज्यातील रुग्णालयांत मेडिकल स्टोअर देऊन त्यात जनेरिक औषध असावीत असा केंद्र सरकारचा निर्णय आहे. त्या निर्णयाप्रमाणे राज्यसह मुंबईतील रुग्णालयांमध्ये जनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन ठोस निर्णय घेणार का? असा सवाल भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी उपस्थित केला.
विधानपरिषदेच्या सदस्या उमा खापरे यांनी जनेरिक औषधां संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सहभाग घेत आ. प्रविण दरेकर यांनी, जनेरिक औषधं ठेवण्यासाठी बंधनकारक करता परंतु आजही कुठल्याही प्रकारे सक्ती नाही. जनेरिकला अतिशय दुर्लक्षित केले जातेय. राज्यात रुग्णालयांना मेडिकल स्टोअर द्यावीत आणि त्यात जनेरिक औषधे असावीत अशा प्रकारचा केंद्र सरकारचा आग्रह आहे. त्याला मान्यताही मिळालीय. याबाबत महाराष्ट्रातील व मुंबईतील रुग्णालयांना निर्णय देणार का? असा प्रश्न उपस्थित केला.
यावर उत्तर देताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी याबाबत डॉक्टरांना सक्तीच्या सूचना केल्या जातील कि त्यांनी औषधं देताना जनेरिक किंवा ब्रँडेड असे लिहून द्यावे. जेणेकरून मेडिकल स्टोरमध्ये बदल केला जाणार नाही, असे सकारात्मक उत्तर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *