- रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची येणार?
शेकापला लागलेली घरघर, शिवसेनेचे विभाजन. राष्ट्रवादी व भाजपाच्या पथ्यावर पडणार?
महाड (मिलिंद माने) मागील पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाची व राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेमध्ये सत्ता होती मात्र मात्र शेका पक्षाला लागलेली घरघर शिवसेनेत झालेले विभाजन पाहता राष्ट्रवादी काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत शेकाप ऐवजी भाजपाशी हात मिळवणे करून पुन्हा रायगड जिल्हा परिषदेवर वर्चस्व प्रस्थापित करून पुन्हा जिल्ह्याचे राजकारण राष्ट्रवादी व भाजपा भोवतीच फिरणार असल्याचे चित्र निवडणुकीपूर्वी पाहण्यास मिळत आहे
रायगड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार म्हणून सुनील दत्तात्रय तटकरे यांचा विजय झाला तर मावळ लोकसभा मतदारसंघात जे तीन विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्ह्यातले येतात त्यातील (कर्जत खालापूर पनवेल व उरण) या मतदार संघातून श्रीरंग बारणे यांचा विजय झाला मात्र विधानसभेला मात्र जिल्ह्यातील समीकरणे बदलून ३ शिवसेना शिंदे गटाचे तर ३ भाजपाचे व१राष्ट्रवादीचे असे ७ आमदार विधानसभेत निवडून आले
त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपाचे निरंजन डावखरे तर कोकण शिक्षक मतदार संघातून ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिंदे गटाचे व त्यानंतर राज्यसभेवर पेनचे शेकापतुन भाजपात प्रवेश केलेले माजी आमदार धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर खासदार म्हणून लॉटरी लागली
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत बदललेली गणिते व राज्यात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन महायुतीची सत्ता स्थापन झाली त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कुमारी आदिती तटकरे या महिला व बालविकास यांच्या मंत्री झाल्या त्यानंतर काही महिन्यांनी महाडचे भरत गोगावले हे फलोत्पादन मंत्री झाले त्यानंतरच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसल्याने जिल्ह्यातील राजकारण मात्र एकमेकांचे वाभाडे काढण्यातच गेले
तब्बल चार वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषदांच्या व नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहे त्यातील रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या आहेत या निवडणुकीत काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट भाजप तर काही ठिकाणी राष्ट्रवादी व भाजपा अशी युती जिल्ह्यात सर्वत्र झाली
रायगड जिल्ह्यातील १० नगरपरिषदांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने
शिवसेना शिंदे गटाने
भाजपाने
शेतकरी कामगार पक्षाने
वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र त्यानंतर आता खरी लढाई आहे ती जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर
रायगड जिल्ह्यात मागील निवडणुकीत रायगड जिल्हा परिषदेवर राज्याच्या विद्यमान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या तर उपाध्यक्षपद शेकापकडे होते
रायगड जिल्हा परिषदेवर मागील पंचवार्षिक काळात राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाची युती होती मागील जिल्हा परिषदेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे २३
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ३
भारतीय जनता पक्षाचे ३
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे१२
शिवसेनेचे १८
अशी संख्याबळ होते मात्र मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ही एक संघ होती मात्र त्यानंतर शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाले त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार असून देखील जिल्हा परिषदेवर पूर्वी एवढे प्राबल्य राहणे अशक्य असल्याचे सध्याच्या बदललेल्या परिस्थितीमुळे शिवसेना शिंदे गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यातील मतांच्या विभाजनामुळे शिंदे गटाला अपेक्षित यश प्राप्त करणे अवघड जाणार आहे तशीच परिस्थिती शेका पक्षाची असून शेका पक्षाचा जिल्ह्यात एकही आमदार नसल्याने व जिल्ह्यात शेकापाला लागलेली घरघर पाहता पुन्हा शेकाप पूर्वीच्या दमाने जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करेल एवढा अपेक्षित संख्याबळ प्राप्त करेल का अशी शंका सर्वच राजकीय पक्षांकडून चर्चिली जात आहे
त्यामानाने राज्यात भाजपा सत्तेवर असल्याने व भाजपाचे तीन आमदार जिल्ह्यात असल्याने तसेच एक खासदार राज्यसभेवर व एक आमदार पदवीधर मतदारसंघातील असल्याने भाजपा जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी एक अंकी आकड्यापासून दोन अंकी आकडे मिळवण्यासाठी जोरदार तयारीला लागल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे
एकंदरीत रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व सत्ताधारी भाजपा यांच्या चढावर होणार आहे मात्र आज तरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा हे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेश संख्या बळ प्राप्त करतील असे चित्र सध्या तरी जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे