नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (४ जून) पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला. आज संध्याकाळी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत सरकार स्थापनेवर चर्चा होणार आहे. दरम्यान, मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मोदी म्हणाले की, राजकारणात चढ-उतार येत असतात.आमच्या सरकारने खूप चांगले काम केले आहे.विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले की, ‘जिंकलो आम्ही आहोत अन दुसरे उड्या मारत आहेत’ (जीते हम हैं, उछल दूसरे रहे).
वास्तविक, लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी (४ जून) जाहीर झाले. यामध्ये एनडीए आघाडीने २९३ जागा जिंकल्या आहेत. तर इंडी आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यानंतर बुधवारी (५ जून) नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला.
तसेच नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी काम केल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही चांगले काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, ‘जिंकलो आम्ही आहोत अन दुसरे उड्या मारत आहेत’.आमच्या सरकारने खूप चांगले काम केले आहे, असे माजी पंतप्रधान मोदी म्हणाले.दरम्यान, एनडीएचे सरकार तिसऱ्यांदा स्थापन होणार आहे.नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनीही आपण एनडीएमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे.