महाड (मिलिंद माने) महाड आंबडवे (महाप्रळ) मार्गावर अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या कारभारामुळे पुन्हा एकदा रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली असून मार्गावर पाणी साठल्याने व पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डा निर्माण झाल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
महाड अंबडवे हा राज्यमार्ग खाडीपट्ट्या गावातून जातो या या मार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी कडून चालले आहे मात्र काही ठिकाणी डांबरीकरण काही ठिकाणी कॉंक्रिटीकरण होत असून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे
महाड वरून खाडीपट्टा मार्गे मंडणगड दापोली कडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे रायगड रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा महत्त्वाकांक्षी मार्ग असून या राष्ट्राचे काँक्रिटीकरण करण्याचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला आहे मात्र याच मार्गावरील महाप्रळ जवळील रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाण्याची तळे साचले असून सुमारे एक फूट वर खड्डा या रस्त्यात तयार झाल्याने या रस्त्यावरून वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे पावसाळ्याच्या काळ असल्याने रस्त्यावर किती पाणी आहे याचा अंदाज वाहन चालकांना येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र या रस्त्याचे काम करणाऱ्या अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीला कोणतेच सोयर सुतक पडले नसल्याचे पाहण्यास मिळत आहे
राष्ट्रीय महामार्ग विभाग झोपी गेला आहे का?
या रस्त्याचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे मात्र त्यावर देखरेख करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यालय महाडमध्ये आहे मात्र या कार्यालयातील शाखा अभियंता उपविभागीय अभियंता यांना या महामार्गाच्या दुरावस्थेबाबत कोणतेच देणेघेणे नसल्याचे पाहण्यास मिळत आहे केवळ ठेकेदाराची हित जपणे व कार्यालयात बसून रस्ता सुस्थितीत असल्याचे ग्रामस्थांना सांगणे व त्यांच्या तक्रारीचे निवारण न करणे हेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे काम असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार करून देखील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी वस्तुस्थिती पाहण्यासाठी स्वतः जाऊन पाहणी करीत नसल्याचे अनेक ग्रामस्थांनी यावेळी सांगितले एकंदरीत महाड येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचा कारभार म्हणजे आंधळ दळतय कुत्र फिट खाते असा झाला आहे कोकणातील गणेशोत्सव काळात या मार्गावरून अनेक वाहन चालक ये जा करीत असतात गणेशोत्सव सणाला केवळ काही दिवसांचा अवधी उरला असतानाही व त्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण पाहता हा महामार्ग देखील पाण्यात जाणार असल्याचे चित्र या निमित्ताने जागोजागी पाहण्यास मिळत आहे