उत्तर मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विनायक घोडे व सरचिटणीसपदी प्रवीण वराडकर निवड — विजय वैद्य यांना श्रद्धांजली अर्पण

उत्तर मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विनायक घोडे तर सरचिटणीसपदी प्रवीण वराडकर यांची एकमताने निवड ; उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारणे हीच विजय वैद्य यांना आदरांजली ठरेल ; ज्येष्ठ समीक्षक संजय डहाळे यांनी व्यक्त केल्या भावना. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : उत्तर मुंबईत भव्य पत्रकार उभारणे हीच खरी विजय वैद्य यांना आदरांजली ठरेल, अशा शब्दांत ज्येष्ठ नाट्य समीक्षक संजय डहाळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, उत्तर मुंबई पत्रकार संघाच्या आज घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत दूरदर्शनचे विनायक घोडे यांची उत्तर मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी प्रवीण वराडकर यांची एकमताने निवड करण्यात आली. जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील फुलपाखरु उद्यानातील सहकार भवनात ही सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. अध्यक्ष विजय वैद्य यांच्या निधनामुळे आजची विशेष सर्वसाधारण सभा उपाध्यक्ष भारत कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सरचिटणीस योगेश वसंत त्रिवेदी यांनी सूत्रसंचालन करतांना संघाच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे सरचिटणीस दीपक भातुसे, कोषाध्यक्ष विनोद यादव, कोकण मराठी साहित्य परिषद सदस्य जगदीश भोवड, मार्मिक चे स्तंभलेखक योगेंद्र ठाकूर, संजय डहाळे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य किरीट मनोहर गोरे, गुजराती पत्रकार संघाचे सरचिटणीस कुनेश दवे, ज्येष्ठ पत्रकार व लेखिका नीलिमा जांगडा, जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीच्या प्रमुख संपादक वृषाली कदम परब, अर्थतज्ज्ञ विनायक कुळकर्णी, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, अवयवदान चळवळीचे कार्यकर्ते खंदे प्रवीण वराडकर आदींचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी विनायक घोडे (अध्यक्ष), भारत कदम (उपाध्यक्ष), रविंद्र राऊळ (कोषाध्यक्ष), प्रवीण वराडकर (सरचिटणीस), नीलिमा जांगडा (सहचिटणीस) तसेच किरीट गोरे, कुनेश दवे, योगेंद्र ठाकूर, वृषाली कदम परब, योगेश वसंत त्रिवेदी यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

सुरुवातीला संजय डहाळे यांनी उत्तर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष दिवंगत विजय वैद्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आणि विजय वैद्य यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सर्वांनी दोन मिनिटे उभे राहून वैद्य यांना श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. भरत घाणेकर यांच्या सौजन्याने सहकार भवन उपलब्ध करुन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *