मिरा भाईंदर मध्ये जल्लोष स्वच्छतेची व‍िजयी रॅली मोठ्या उत्साहात 

 

मिरा भाईंदर – केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण सन २०२४-२५ मध्ये देशातील ३ ते १० लाख लोकसंख्येच्या शहरात मिरा भाईंदर शहराने प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. याचे औचित्य साधून, शनिवार, दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी मॅक्सस मॉल ते मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालय या मार्गावर ‘जल्लोष स्वच्छतेचा विजयी मिरवणूक’ काढण्यात आली.

या म‍िरवणूकीच्या पूर्वी उपायुक्त डॉ. सच‍िन बांगर यांनी प्रास्ताव‍िक सादर केले. त्यानंतर म‍िरा भाईंदर शहराचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सर्व सफाई कर्मचा-यांचे आभार व्यक्त केले व या राष्ट्रीय पुरस्कारान‍िम‍ित्त शुभेच्छा द‍िल्या.

स्वच्छतेच्या कामात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या मह‍िला सफाई कर्मचारी व पुरूष सफाई कर्मचा-यांचे प्रत‍िन‍िधी म्हणून पाच मह‍िला व पाच पूरूष सफाई कर्मचा-यांना व्यासपीठावर बोलवून मा. आमदार व आयुक्त तथा प्रशासक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा राष्ट्रपती पुरस्कार सफाई कर्मचा-यांना व शहरातील नागर‍ीकांना समर्प‍ित केल्याचे आयुक्तांनी सांग‍ून सफाई कर्मचा-यांच्या कामाचा यथोच‍ित सन्मान व सत्कार केला.

यानंतर मा. आयुक्त तथा प्रशासक राधाब‍िनोद अ. शर्मा यांनी उपस्थ‍ितांना संबोध‍ित केले. या संबोधनात अध‍िकारी, कर्मचारी व व‍िशेषत: सर्व सफाई कर्मचा-यांचे आभार व्यक्त केले. त्याच बरोबर हा मान ट‍िकवून ठेवण्यासाठी शहरातील सर्व नागर‍िकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. यासाठी “माझे शहर, माझा अभ‍िमान” या भावनेने सर्व नागर‍िकांनी शहरात स्वच्छता राहील याची व‍िशेष काळजी घेतली पाह‍िजे. तसेच हा प्रथम क्रमांक कायम ट‍िकवून ठेवण्यासाठी म‍िरा भाईंदर महापाल‍िका सतत प्रयत्नशील राहील असे सांग‍ितले.

या व‍िजयी म‍िरवणूकीत म‍िरा भाईंदर महापाल‍िकेचे सफाई कर्मचाऱ्याबरोबरच शहरातील नागर‍ीकांनीदेखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. म‍िरवणुकीच्या मार्गावर व‍िव‍िध ठ‍िकाणी मह‍िलांनी आयुक्तांसह इतर अध‍िका-यांचे औक्षण करून अभ‍िनंदन करत शुभेच्छा द‍िल्या. तसेच नागर‍ीकांनी पुष्पवृष्टी करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला. या विजयी मिरवणूकीच्या मार्गावर पुष्प वृष्टीने झालेली अस्वच्छता त्वरीत स्वच्छ करण्यात आली.

आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या व‍िजयी म‍िरवणूकीत म‍िरा भाईंदर शहराचे मा. आमदार श्री. नरेंद्र मेहता, माजी उपमहापौर श्री. हसमुख गेहलोत, माजी सभापती सूरेश खंडेलवाल, माजी सभापती ध्रुवक‍िशोर पाटील, माजी सभापती डॉ. सुशील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, उपायुक्त (मु.) कल्पिता पिंपळे, मिरा भाईंदर पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण (भा. पो. से.), कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, कार्यकारी अभियंता शरद नानेगांवकर, स‍िस्टम मॅनेजर तथा जनसंपर्क अध‍िकारी राजकुमार घरत, सहा. आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) योगेश गुन‍िजन, माजी नगरसेवक, इतर मनपा अध‍िकारी व पोल‍िस अध‍िकारी/कर्मचारी,वाहतुक पोल‍िस अध‍िकारी/कर्मचारी, अग्निशामक अधिकारी/कर्मचारी व‍िशेषत: सफाई कर्मचा-यांनी व नागर‍िकांनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभाग घेतला. ‘जल्लोष स्वच्छतेचा विजयी मिरवणूक’ मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *