महिलांसाठी राबवणार विविध योजना _ प्रिया पाटील
वाढदिवसा प्रसंगी केली घोषणा
मुंबई : डोंगरी उमरखाडीतील प्रसिद्ध समाजसेविका आणि शिवसेना मुंबादेवी विधानसभेच्या महिला
उपविभागप्रमुख प्रिया पाटील यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यत साजरा करण्यात आला याप्रसंगी रुपेश फाउंडेशन चे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याची घोषणा प्रिया पाटील यांनी केली .
शिवसेना मुंबादेवी विधानसभा संघटक रुपेश पाटील यांच्या पत्नी प्रिया पाटील ह्या रुपेश पाटील ह्यांच्या सोबत नेहमीच समाजसेवेत अग्रेसर असतात डोंगरी उमरखाडी परिसरात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात त्या न चुकता हजर असतात. त्यामुळेच त्यांना समाजातील प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे अशी त्यांची ददृढ इच्छा आहे.
मुंबादेवी परिसरात मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीयांची वस्ती आहे. इथल्या घरांमध्ये राहणारी बहुतांश मंडळी रोजंदारीवर काम करतात. तसेच महिला वर्ग घर कामात व्यस्त असतात परंतु सरकारी योजना मार्फत महिलांना आर्थिक बळ देण्याचे काम केले पाहिजे जेणेकरून इथल्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात अशी भावना प्रिया पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभ दिवशी व्यक्त करून सर्वांची मने जिंकली आहेत.