अवकाळी पावसाचा फटका! स्वारगेट विन्हेरे एसटी बसला बिजघर फाट्याजवळ अपघात ७ प्रवासी जखमी

महाड (मिलिंद माने): अवकाळी पावसाने महाड विन्हेरे राज्य मार्ग रस्त्यावर चार दिवसात दुसरा अपघात एकाच ठिकाणी झाला असून या अपघातात एसटी मधून प्रवास करणारे सात प्रवासी जखमी झाले असून त्यांना महाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

महाड विन्हेरे राज्य मार्गावर स्वारगेट एसटी डेपो चीMH.१४.BT.४७७५ या क्रमांकाची बस विन्हेरे गावातून येथून स्वारगेट कडे जाण्यास दुपारी२.५५ त्या सुमारास निघाली त्याच वेळेस अवकाळी पाऊस चालू झाला होता व चार दिवसापूर्वी याच ठिकाणी आयशर टेम्पो व मिनी डोअर यांच्या झालेल्या अपघाताच्या ठिकाणी सदरच्या बस अवकाळी पडलेल्या पावसामुळे घसरून झालेल्या अपघातात बस जागेवर एका दिशेला कलंडल्याने बस मधून प्रवास करणारी पाच प्रवासी यांच्यासहित एसटी चालक व वाहक यांना गंभीर दुखापत झाली आहे या सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्वारगेट विन्हेरे एसटी बसला झालेल्या अपघातातील जखमी झालेल्या प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे१) खैरून निशा अहमद देवळेकर राहणार भोंमजई वय वर्ष५५

२) निशा सुनील घाडगे वय वर्ष ९ राहणार रुपवली

३) सुजाता सुरेश यादव राहणार विन्हेरे वय वर्ष ४९

४) सुरेश धाकू यादव राहणार वय वर्ष ६०

५) धनश्री सुरेश यादव राहणार विन्हेरे वय वर्ष २७

६) मुरलीधर दिगंबर पोफळे वाहन चालक भेकरे नगर पुणे वय वर्ष ३६

७) जयश्री बाबू वाघमारे वाहक राहणार सिंहगड पुणे वय वर्ष ४१

स्वारगेट विन्हेरे या एसटी बसला झालेल्या अपघातात या बसमधून १५ प्रवासी प्रवास करीत होते त्यापैकी चालक व वाहकासहित ७ प्रवासी जखमी झाले असून त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *