महाड (मिलिंद माने) अवकाळी पावसाने कोकण शहर संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांसहित शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून रविवारच्या दिवशी पुणे जिल्हा हद्दीत ताम्हणी घाटात ऍसिड टँकर उलटल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या घाटातून कोकणात येणारी व कोकणातून पुणे जिल्ह्यात जाणारी वाहतूक पाली खोपोली मार्गे वळवण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्य हद्दीतील डोंगरवाडी या ठिकाणी ऍसिड चा टँकर उलटल्याने टँकर मधील ऍसिड बाहेर पडून हवेत पसरल्याने संपूर्ण परिसर ऍसिड च्या उग्रवाशाने प्रदूषित झाल्याने वाहतूक पोलीस व पुणे जिल्हा प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक दुपारी बारा वाजल्यापासून बंद केली आहे
पुणे व कोकणाला जोडणाऱ्या ताम्हणी घाटात ऍसिड टँकर उलटल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करून ती पाली खोपोली मार्गे वळवण्यात आल्याने पाली खोपोली मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाल्याची पाहण्यास मिळत आहे ताम्हणी घाटातील अशी टँकर उलटल्याने त्यातील ऍसिड बाहेर पडून परिसर पूर्णपणे प्रदूषित झाला आहे तो ऍसिड टँकर अपघात ग्रस्त ठिकाणावरून हलवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू असून अपघात ग्रस्त टँकर मधील चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे