प्रशासनाच्या नियोजन शून्यतेच्या कारभारामुळे किल्ले रायगडावरील वाहतूक कोंडीचा शिवभक्तांना फटका! 

महाड( प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर सुट्टीच्या दिवशी तसेच अन्य दिवशी हजारो व पर्यटक रायगडावर येत असतात मात्र पोलीस यंत्रणा व स्थानिक प्रशासन यांच्या तील समन्वयाच्या तसेच नियोजन शून्यतेच्या अभावामुळे रविवार २१ डिसेंबर रोजी रायगडावर आलेल्या हजारोस शिवभक्तांना व पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने पर्यटकांनी प्रशासनावर नाराजी ओढवली व ताशांचा वाहतूक कोंडीत अनेक पर्यटकांना माघारी फिरावे लागल्याचे चित्रकार पाहण्यास मिळाले

 

महाड मधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच नगर परिषदेच्या निकालाच्या धामधुमीत पोलीस प्रशासन यंत्रणा व महसूल प्रशासन यंत्रणा अडकली होती तसेच रविवार २१ डिसेंबर. रोजी सुट्टीचा दिवस असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्यावर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.

किल्ले रायगड वर जाणाऱ्या रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत त्यातच रविवार सुट्टीचा दिवस असल्याने राज्याच्या मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर ,सांगली, सातारा, या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटकांबरोबरच राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहली करता आलेल्या विद्यार्थ्यांच्या बसेस देखील मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या यामुळे पाचाड पासूनच हिरकणी वाडी पर्यंत ते चित्त दरवाज्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती सुमारे दोन ते तीन तास पर्यटक या वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचे रायगड किल्ला येथील हॉटेल मालक शिराज सय्यद यांनी सांगितले

शासकीय वाहनतळ उभारणे तातडीने गरजेचे!

रघु वीरजी देशमुख !

किल्ले रायगड पाहण्यासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांबरोबरच देश विदेशातून देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक रायगडावर येत असतात शासनाने किल्ले रायगड कडे जाणाऱ्या रोपवे फाटा म्हणजेच वाय सेक्शन ,. जिजामाता वाडा व जिजामाता समाधी या ठिकाणी वाहनतळ उभारण्याची घोषणा केली व त्यासाठी आवश्यक असणारी जमीन देखील संपादित केल्याचे समजते मात्र प्रत्यक्षात अजून त्याला मूर्तमेढ स्वरूप आलेले नसल्याने या वाहतूक कोंडीचा सामना सुट्टीच्या दिवशी पर्यटकांबरोबरच स्थानिक ग्रामस्थांना देखील सहन करावा लागत असल्याचे किल्ले रायगड हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष रघुवीरजी देशमुख यांनी सांगितले

जागतिक वारसांच्या नामांकनामध्ये किल्ले रायगड मात्र प्रशासन सुस्त अवस्थेत का?

युनेस्को च्या जागतिक वारसाच्या यादीत किल्ले रायगडचा समावेश झाला आहे मात्र किल्ले रायगडावर तसेच या परिसरातील स्थानिक रहिवाशांना व व्यावसायिकांना नामांकनाबाबत काय निकष असतात तसेच याबाबत कोणत्या मार्गदर्शक सूचनांचा अंतर्भाव आहे याची सूत्राम कल्पना नाम महसूल प्रशासनाला ना स्थानिक पोलिसांना ना स्थानिक ग्रामपंचायतींना त्यामुळे जागतिक वारसा मध्ये किल्ले रायगडचा समावेश झाला एवढीच काय ती माहिती स्थानिक जनतेला माहिती आहे मात्र नामांकनाचे निकष कोण पाळणार? त्याची अंमलबजावणी कोण करणार? याबाबत राज्य शासनाचा कोणता विभाग यावर अंमलबजावणी करणार हे सर्व काही गुलदस्त्यात असल्याने वाहतूक कोंडी पासून ते किल्ले रायगडावर असणाऱ्या व किल्ले रायगडावर जाणाऱ्या मार्गावर शिवभक्तांना व पर्यटकांना होणाऱ्या अडचणींचा सामना सातत्याने होत असून यातून मार्ग कोणी काढायचा असा सवाल या निमित्ताने पर्यटकांकडून विचारला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *