रायगड प्राधिकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रायगडचा पायरी मार्ग कोसळला, दुर्घटना नाही.
रायगड प्राधिकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामांना कधी ब्रेक लागणार पर्यटकांचा सवाल?
महाड, (मिलिंद माने ) छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जाण्यासाठी असणारा पायरी मार्गाचा काही दगडी भाग ७ ऑगस्ट. दुपारच्या सुमारास कोसळला. महादरवाजाच्या जवळील हा भाग कोसळून मार्ग नादुरुस्त झाला आहे. दरम्यान या मार्गानेच हजारो शिवभक्त गडावरती येजा करत असतात. तरी आज कोणत्याही प्रकारची दुर्घटना झाली नसली तरी रायगड प्राधिकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामा मुळेच भविष्यात हा मार्ग धोकादायक ठरू शकतो. असा हा संतप्त सवाल रायगडावर पायी जाणाऱ्या अनेक पर्यटकांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना विचारला आहे
किल्ले रायगड वर चित्तदरवाजा इथून जाणारा पायरी मार्गाचा महादरवाजा येथील काही ७ ऑगस्ट रोजी दुपारी कोसळला. या कोसळल्या भागामुळे सदरचा मार्ग नादुरुस्त झाला असून पर्यटकांसाठी आजचा दिवस हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.
रायगड प्राधिकरण विभागाच्या वतीने या ठिकाणी तात्पुरते पाईप बांधून मार्ग सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र असे असले तरी येणाऱ्या काळात कोसळणाऱ्या पावसामुळे किल्ले रायगड वरती जाणारा हा पायी मार्ग धोकादायक ठरू शकतो.
किल्ले रायगडावर जाणारा पायी मार्गाचा भाग हा कोसळल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. किल्ले रायगडावरील विकास कामे ही रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून कामे केली जात आहेत. यामध्ये चित्तदरवाजा ते महादरवाजा मार्गे किल्ले रायगड वरती जाणाऱ्या या पायरी मार्गाचा देखील समावेश आहे. बऱ्याच ठिकाणी या पायरी मार्गाचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी हे काम पूर्ण झाले आहे. मात्र वारंवार या कामाच्या बाबतीमध्ये त्याच्या दर्जाच्या गुणवत्तेबाबत आरोप केले जात आहेत.
रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून पायरी मार्गावर चालू असलेली कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याचे रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष यांना याबाबतची कल्पना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी दिली होती तरी देखील ही कामे निकृष्ट दर्जाचे नसून त्यात अनियमित्ता आहे अशाच पद्धतीने या ठिकाणी पायरी मार्ग कोसळला होता तसेच खूबलढा या बुरुजाचा काही भाग देखील कोसळला होता. या ठिकाणी होत असलेली कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप सातत्याने होत आहे त्यामुळे सदरचा मार्ग हा यापुढे धोकादायक ठरू शकत असतानाही रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे हे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना व रायगड प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर का पांघरून घालत आहेत असा सवाल रायगड किल्ल्यावर पायी जाणाऱ्या अनेक पर्यटकांनी बोलून दाखविला एकंदरीत रायगड प्राधिकरणाच्या कामांवर ना राज्य सरकारचा अंकुश ना रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून छत्रपती संभाजी राजे यांचा. एकंदरीत रायगड प्राधिकरण निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी घालण्यामध्ये नेमके कारण काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे