पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे अंतर्गत मुंबई सहकारी बोर्ड लिमिटेड, मुंबई यांच्या वतीने तापोळा–महाबळेश्वर येथे पगारदार सहकारी पतसंस्था व नागरी सहकारी पतसंस्थांचे संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराला मुंबईतील विविध सहकारी संस्थांचा उदंड प्रतिसाद लाभला.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई सहकारी बोर्डाचे अध्यक्ष श्री. अनिल गजरे उपस्थित होते. यावेळी बोर्डाचे सचिव विठ्ठल वाळुंज, सहकार जीवन मासिकाचे उपसंपादक अमोल खरात, संचालक हिराचंद्र सूर्यवंशी, संचालक हंबीरराव पवार, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश मसे, तसेच मुंबई सहकारी बोर्डाचे व्यवस्थापक सुयोग अहिरे आणि संघाचे प्रशिक्षण अधिकारी उपस्थित होते.
या प्रशिक्षण शिबिरात सहकारी चळवळीतील सद्यस्थिती, पतसंस्थांचे व्यवस्थापन, कायदेशीर बाबी, आर्थिक शिस्त व भविष्यातील आव्हाने यावर मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी प्रतिनिधींनी या प्रशिक्षणामुळे संस्थेच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला.