रायगडावर वर्ष अखेरीस येणाऱ्या पर्यटकांमुळे पुन्हा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता ! 

रायगडावर वर्ष अखेरीस येणाऱ्या पर्यटकांमुळे पुन्हा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता !

वाहन तळाची तातडीने निर्मिती करून. स्थानिक ग्रामस्थांची वाहतूक कोंडीतून सुटका करा!

हॉटेल मालक वैभव देशमुख व शिराज सय्यद!

 

महाड( प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर . आज नाताळच्या सुट्टीच्या दिवशी आलेल्या पर्यटक व शिवभक्तांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला किल्ले रायगड परिसरात रायगड प्राधिकरण व राज्य शासनाने तातडीने वाहनतळ उभारण्याची प्रक्रिया चालू करून स्थानिकांना दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका करा अशी मागणी हॉटेल मालक वैभव देशमुख व शिराज सय्यद यांनी प्रशासनाकडे केली आहे तसेच वर्ष अखेरीस मोठ्या प्रमाणावर रायगड किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडीचा पुन्हा एकदा सामना प्रशासनाबरोबरच पर्यटकांना देखील करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे

रायगडावर . सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक व शिवभक्त येत असतात मात्र पोलीस यंत्रणा व स्थानिक प्रशासन यांच्या तील समन्वयाच्या तसेच नियोजन शून्यतेच्या अभावामुळे रविवार २१ डिसेंबर रोजी वाहतूक कोंडी झाली होती तीच परिस्थिती थोड्याफार प्रमाणात आग नाताळच्या सुट्टीमुळे निर्माण झाली तसेच वर्ष अखेरीस ३० व ३१ डिसेंबर रोजी रायगडावर येणाऱ्या पर्यटकांना व शिवभक्तांना पुन्हा मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे

 

रायगड किल्ल्यावर २१ डिसेंबर रोजी.हजारो शिवभक्तांना व पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने. अनेक पर्यटकांनी प्रशासनावर नाराजी ओढवली व त्यामुळे या वाहतूक कोंडी मुळे अनेक पर्यटकांना माघारी फिरावे लागल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते

आज नाताळ २५ डिसेंबर रोजी सुट्टीचा दिवस असल्याने .शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी किल्ले रायगडावर मोठ्या संख्येने खाजगी वाहनांनी आले होते मात्र आज वाहतिक कोंडी जरी असली तरी पोलिसांनी वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केली होती मात्र वाहन पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्याने पर्यटक व पोलिस यंत्रणादेखील हतबल झाली आहे वाहने कुठे उभी करायची असा प्रश्न वाहतूकदारांसहित पोलीस प्रशासनाला देखील पडला असल्याने कित्येक वेळा पोलीस व वाहन चालकांमध्ये पार्किंग वरून वादविवाद देखील होतात मात्र स्थानिक हॉटेल मालक संघटने कडून यावर नियंत्रण मिळवले जाते

 

किल्ले रायगड. पाहण्यासाठी. वर्ष अखेरीस ३० व ३१ डिसेंबर रोजी सुट्टीचा दिवस. नसला तरी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पडलेली सुट्टी लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यां सहित पालक देखील रायगड किल्ल्याला भेट देणे पसंत करतात त्यासाठी राज्याच्या मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर ,सांगली, सातारा, या जिल्ह्यातून पर्यटक व शिवभक्त येतात

पाचाड पासूनच हिरकणी वाडी पर्यंत ते चित्त . दरवाजा ते नाणे दरवाजा पर्यंत रस्ता चिंचोळा व उताराचा असल्याने येणारे पर्यटकांच्या गाड्या या रस्त्यावर उभ्या राहत असल्याने रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून छत्री निजामपूर पर्यंत जाणाऱ्या एसटी बस त्या गावापर्यंत जात नसल्याने स्थानिक ग्रामस्थांना सुमारे सात ते आठ किलोमीटरची पायपीट करीत गावात जावे लागते याचा परिणाम वृद्ध व अपंग व्यक्ती तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्या ंना देखील याचा फटका बसत आहे यासाठी शासनाने तातडीने वाहनतळासाठी ज्या जागा संपादित केल्या आहेत त्या ठिकाणी वाहन तळाचे काम चालू करण्याची मागणी हॉटेल मालक वैभव देशमुख व शिराज सय्यद यांच्यापासून हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर देशमुख यांनी देखील शासनाकडे केली आहे

 

शासकीय वाहनतळ उभारणे तातडीने गरजेचे!

रघु वीरजी देशमुख !

 

किल्ले रायगड पाहण्यासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांबरोबरच देश विदेशातून देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक रायगडावर येत असतात शासनाने किल्ले रायगड कडे जाणाऱ्या रोपवे फाटा म्हणजेच वाय सेक्शन ,. जिजामाता वाडा व जिजामाता समाधी या ठिकाणी वाहनतळ उभारण्याची घोषणा केली व त्यासाठी आवश्यक असणारी जमीन देखील संपादित केल्याचे सांगण्यात येते मात्र प्रत्यक्षात अजून त्या कामाला प्रत्यक्ष मुहूर्त लागत नसल्याने वाहतूक कोंडीचा सामना सुट्टीच्या दिवशी पर्यटकांबरोबरच स्थानिक ग्रामस्थांना देखील सहन करावा लागत असल्याचे किल्ले रायगड हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष रघुवीरजी देशमुख यांनी सांगितले

 

जागतिक वारसांच्या नामांकनामध्ये किल्ले रायगड मात्र प्रशासन सुस्त अवस्थेत का?

युनेस्को च्या जागतिक वारसाच्या यादीत किल्ले रायगडचा समावेश झाला आहे मात्र किल्ले रायगडावर तसेच या परिसरातील स्थानिक रहिवाशांना व व्यावसायिकांना नामांकनाबाबत काय निकष असतात तसेच याबाबत कोणत्या मार्गदर्शक सूचनांचा अंतर्भाव आहे याची सूत्राम कल्पना नाम महसूल प्रशासनाला ना स्थानिक पोलिसांना ना स्थानिक ग्रामपंचायतींना त्यामुळे जागतिक वारसा मध्ये किल्ले रायगडचा समावेश झाला एवढीच काय ती माहिती स्थानिक जनतेला माहिती आहे मात्र नामांकनाचे निकष कोण पाळणार? त्याची अंमलबजावणी कोण करणार? याबाबत राज्य शासनाचा कोणता विभाग यावर अंमलबजावणी करणार हे सर्व काही गुलदस्त्यात असल्याने वाहतूक कोंडी पासून ते किल्ले रायगडावर असणाऱ्या व किल्ले रायगडावर जाणाऱ्या मार्गावर शिवभक्तांना व पर्यटकांना होणाऱ्या अडचणींचा सामना सातत्याने होत असून यातून मार्ग कोणी काढायचा असा सवाल या निमित्ताने पर्यटकांकडून विचारला जात आहे

एकंदरीत किल्ले रायगड परिसरात शासनाने व रायगड प्राधिकरणाने याकडे गांभीर्याने पाहून वाहन तळाच्या कामाला तातडीने सुरुवात करावी अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांसहित हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर देशमुख यांच्यापासून हॉटेल मालक वैभव देशमुख व शिराज सय्यद तसेच महाराष्ट्र वाहतूक सेनेचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाष मोरे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *