महाड (मिलिंद माने) महाड दापोली राज्य मार्गावर२४ जुलै रोजी बिज घर फाटा व मांडवकर कोंड या दरम्यानच्या रस्त्या गुळगुळीत झाल्याने पुणे फौजी अंबवडे एसटी बस घसरून झालेल्या अपघातात बसमधील चालक वाहकासहित आठ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले होते या घटनेनंतर या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराने या परिसरातला रस्ता जेसीबी यंत्राच्या साह्याने खरवडण्यास सुरुवात केला असला तरी . या रस्त्याचा दर्जा पावसाळ्यात कायम राहील का हा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
महाड दापोली राज्य मार्गावर २४ जुलै रोजी दुपारी. पुणे फौजी अंबवडे अहिरे कोंड ही बस बीज घर फाटा ते मांडवकर कोंड यादरम्यानच्या रस्ता गुळगुळीत झाल्याने या ठिकाणी घसरून झालेल्या अपघातात एसटीतून प्रवास करणाऱ्या ८ प्रवाशांसहित चालक व वाहक. गंभीर रित्या जखमी झाले या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अख्ख्या तयारीत असणाऱ्या एफएमसी कंट्रक्शन कंपनीला जाग आली असून या मार्गावरील रस्ता ऐन पावसाळ्यात जेसीबी यंत्राच्या साह्याने खरवडण्याचा प्रकार चालू केला आहे त्यामुळे या रस्त्याचा दर्जा ऐन पावसाळ्यात उत्तम प्रतीचा राहील का ?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे
महाड दापोली राज्य मार्गावर ऐन उन्हाळ्यात मे महिन्याच्या कालावधीत सुस्थितीत असणारा रस्त्यावर . एफ एम सी कन्स्ट्रक्शन कंपनीने डांबर मारून व त्यावर ग्रिट फवारणी केली होती मात्र त्यानंतर ६. मे पासून चालू झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर चालू झालेल्या अपघातांची मालिका आज जुलै महिना संपत आला तरी मात्र अखंडपणे चालू आहे आज या रस्त्यावर जेसीबी यंत्राच्या साह्याने खरवडण्याचा प्रकार चालू आहे मात्र त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही शाखा अभियंता कार्यरत नसल्याने या रस्त्याचा दर्जा ऐन पावसाळ्यात एक महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव काळात या मार्गावरून दापोली खेड मंडणगड व रायगड जिल्ह्यातील विन्हेरे विभागात व खेड मार्गे तुळशी खिंड जाणाऱ्या वाहनांना सुस्थितीत राहील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे