महाड (मिलिंद माने) – कोकण रेल्वेच्या महाड तालुक्यातील विन्हेरे रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबे दिल्यास कोकणातील शेतकऱ्यांना व त्याचबरोबर पर्यटक व उद्योगधंदे वाढीस चालना मिळेल यासाठी 32 रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी विन्हेरे विभागातील नवोदित प्रगतशील शेतकरी संतोष रघुनाथ भोसले यांनी केली आहे
महाड तालुक्यातील शिरसवणे गावातील नवोदित प्रगतशील शेतकरी संतोष रघुनाथ भोसले याने राज्य सरकारच्या कृषी खात्याच्या सहकार्याने मेहनतीच्या व परिश्रमाच्या जोरावर सुमारे साडेतीन एकर परिसरात तैवान जातीच्या पेरू फळाची लागवड केली आहे
महाड सारख्या ग्रामीण भागात तैवान जातीच्या पेरूची लागवड केल्यानंतर त्याची विक्री करणे म्हणजे मुंबईतील वाशी येथील एपीएमसी मार्केट व पुणे येथील एपीएमसी मार्केट ही दोन्ही ठिकाणी सुमारे दीडशे किलोमीटर अंतर असल्याने वाहतूक खर्च शेतकऱ्याला परवडणार नाही मात्र जवळच असणाऱ्या एक किलोमीटर अंतरावर विन्हेरे हे कोकण रेल्वेचे स्थानक आहे या स्थानकावर केवळ कोकण रेल्वेच्या रत्नागिरी दिवा. रत्नागिरी ५०१०३ व सावंतवाडी दिवा सावंतवाडी१०१०५. या दोनच प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या ना थांबे आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील विन्हेरे रेल्वे स्थानकावर जर काही मोजक्याच गाड्यांना थांबे दिले तर शेतकऱ्यांसह पर्यटना व उद्योग धंदे वाढीस जालना मिळणार असल्याने त्याचा सर्वाधिक फायदा हा शेतकऱ्यांना होणार असल्याने ३२ रायगड लोकसभा मतदार संघातून गेलेले विद्यमान खासदार सुनील दत्तात्रय तटकरे यांनी याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करावी अशी आर्त हाक शिरसवणे गावातील प्रगतशील संतोष रघुनाथ भोसले यांनी केली आहे एकंदरीत कोकण रेल्वे मार्गावर असणाऱ्या काही महत्त्वाच्या स्थानकांवर पर राज्यात जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबे द्यावे कारण रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील विन्हेरे हे रेल्वे स्थानक रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या हद्दीवर असून या रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर कोकण रेल्वेचा फाळकेवाडी व दिवाणखवटी बोगदा असल्याने या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकावर साईडिंगला थांबवल्या जातात अशा मेल एक्स्प्रेस गाड्यांना थांबा दिला तर या मार्गावरील प्रवाशांसहित शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न द्वारे तयार होणारा आंबा काजू यासारखा नाशवंत फळे मुंबई ,ठाणे, पुणे, मदत होईल मात्र यासाठी इच्छाशक्ती लोकप्रतिनिधींची आवश्यक आहे ती इच्छाशक्ती ३२रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील दत्तात्रय तटकरे हे दाखवतील अशी आशा कोकणकरांना आहे