मुंबई : सन १९४४ मध्ये मुंबई बंदरात (मुंबई डॉक) मालवाहू जहाजाला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आणि नुकतेच पुनर्जतन (रेस्टोरेशन) करण्यात आलेल्या ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’ असलेल्या अग्निशमन वाहनाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हा सोहळा बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पार पडला.

यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या श्रीमती आर्मिडा फर्नांडीज, उद्योजक श्री. गौतम सिंघानिया, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अतुलनीय रुग्णसेवेसाठी नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्रीमती आर्मिडा फर्नांडीज यांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.