चवदार तळे क्रांती दिनाचा शताब्दी महोत्सव सोहळा ना भूतो न भविष्य असा साजरा करावा. ! भाजपा गटनेते नामदार प्रवीण दरेकर

 

नागपूर (प्रतिनिधी) राज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेतील चर्चेदरम्यान भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी महाड मधील ऐतिहासिक चवदार तळे क्रांती दिनाचा शताब्दी महोत्सव न भूतो न भविष्य असा साजरा करण्याची मागणी विधान परिषदेत चर्चेदरम्यान राज्य सरकारकडे केली

 

. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दरम्यान विधान परिषदेत चर्चेच्या वेळी भाजपा गटनेते ना.प्रवीण दरेकर. यांनी महाडच्या चवदार तळ्याच्या क्रांती दिनाला येत्या २०२६ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत असून, यानिमित्त शताब्दी महोत्सव न भूतो न भविष्य असा दैदिप्यमान सोहळा साजरा करावा अशी मागणी सभागृहात केली.

त्याचबरोबर . कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी महाबळेश्वर पोलादपूर मार्गे दापोली व पुणे मढे घाट मार्गे महाड या महामार्गाचा निर्मिती बाबर शासनाने तातडीने दखल घेऊन याबाबत कार्यवाही चालू करावी अशी देखील मागणी दरेकरांनी यावेळी केली.

महाड करांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व संपूर्ण भारताच्या समता व क्रांतीचे प्रेरणास्थान असलेल्या चवदारतळे क्रांती दिनाला २०२६ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. चवदारतळे परिसराचे चवदारतळे विकास प्राधिकरण च्या माध्यमातून सुशोभीकरण करून हा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात व जागतिक दर्जाचा साजरा करावा अशी मागणी स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरण अध्यक्ष नामदार प्रवीण दरेकर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधान परिषद सभागृहात मांडली. या मागणी बरोबरच त्यांनी ऐतिहासिक महाडचा पर्यटन विकास व्हावा यासाठी पुणे मढेघाट मार्गे महाड या पर्यटन महामार्गाची निर्मिती करावी तसेच महाबळेश्वर पोलादपूर मार्गे दापोली या महामार्गाची देखील निर्मिती करून कोकणातील पर्यटनाला बेरोजगारांच्या रोजगाराच्या समस्या मिटवण्यासाठी या दोन मार्गाचा उपयोग होईल त्यासाठी या दोन महामार्गाच्या रस्त्यांना चालना द्यावी अशी मागणी त्यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *