ठाणे ACBची कारवाई : वनपाल व वनरक्षक ₹25 हजार लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

ठाणे, 28 ऑगस्ट – ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी एका सापळा कारवाईत वनविभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे निलेश श्रावणे (47, वनपाल, वर्ग 3) व मच्छिंद्र सोनटक्के (25, वनरक्षक) असून ते दोघेही ठाणे वनविभागात कार्यरत होते.

 

तक्रारदाराच्या नातेवाईकांवर मोरपिस विक्रीप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी व जप्त पिसे परत देण्यासाठी वनपाल श्रावणे यांनी ₹50,000/- लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत ठाणे ACBला माहिती दिल्यानंतर पडताळणी दरम्यान आरोपीने रक्कम कमी करून ₹25,000/- स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले.

 

२८ ऑगस्ट रोजी आयोजित सापळा कारवाईत तक्रारदाराने श्रावणे यांच्या सांगण्यावरून ही रक्कम वनरक्षक सोनटक्के यांच्याकडे दिली. पैसे स्वीकारताच ACB पथकाने पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत दोन्ही आरोपींना रंगेहाथ अटक केली.

 

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 (सुधारित 2018) अंतर्गत कलम 7, 7अ आणि 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

लाचलुचपतबाबत कोणताही अनुभव आल्यास नागरिकांनी त्वरित ACB ठाणे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

संपर्क : ACB ठाणे कार्यालय – 022-25427979

 

टोल फ्री क्रमांक – 1064

 

सचिन मोरे (पोलीस निरीक्ष

क) – 987021224

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *