भाईंदर पश्चिम राधास्वामी रोडवर भीषण अपघात डंपरच्या धडकेत युवक ठार, महिला गंभीर जखमी

 

भाईंदर ( उमेश शिंदे)– भाईंदर पश्चिम येथील परशुराम चौक, राधास्वामी रोडजवळच्या रस्त्यांची दयनीय अवस्था आता जीवघेणी ठरत आहे. दिवसेंदिवस मिरा भाईंदर मध्ये खड्या मुळे अपघात घडत आहे .आज दुपारी एक डंपर व दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला, खड्ड्यांमुळे डंपरने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघात इतका भयंकर होता की, युवक डंपरच्या धडकेत थेट खाली फेकला गेला आणि जागीच त्याचे प्राण गमावले. गंभीर जखमी महिलेस तात्काळ जवळील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहिती नुसार राधास्वामी रोड परिसरातील रस्ते गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी भरलेले आहेत रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. सतत वाहनांची गर्दी, डंपर व ट्रकची वर्दळ यामुळे रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

अपघातानंतर डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांचा मोठा जमाव जमला होता आणि अनेकांनी महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला.

स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व रहिवासी यांच्यातून मागणी होत आहे की, प्रशासनाने येथील रस्त्यांची डागडुजीचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आणखी बळी जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *