मुंबई( मिलिंद माने) केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाला शिवसेना आणि पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण जन्म देण्याचा निर्णय घेतला त्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते यावरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होती मात्र अपेक्षेप्रमाणे पुन्हा तारीख पे तारीख पडल्याने पुन्हा एकदा लावणी लांबणीवर गेली आहे
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाचे नाव ं झाली यावेळी न्यायालयाने १२नोव्हेंबर पासून अंतिम . सुनावणी होईल असे न्यायमूर्ती सूर्यकांता उज्वल भुयान व एन .के .सिंह यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले
सुनावणी लवकर घेण्याची कपिल सिब्बल यांची मागणी!
सर्वोच्च न्यायालयात आज न्यायमूर्ती सूर्यकांत उज्वल भुयान आणि एन के सिंह यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे महाराष्ट्र मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीमध्ये आहे त्यामुळे याबाबतची सुनावणी लवकर घ्यावी कारण या निवडणुकीत पक्ष पुन्हा या चिन्हाचा प्रश्न अजून एक प्रलंबित आहे अशी विनंती शुभल यांनी केली यावर न्यायमूर्ती सूर्याकांत स्पष्ट केले की या प्रकरणी आम्ही १२ नोव्हेंबर २०२५ पासून अंतिम सुनावणी घेऊ
दोन वर्ष न्यायालयीन लढाई!
केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये. शिवसेना मूळ पक्षातून फुटून निघालेल्या एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे मूळ नाव व चिन्ह दिले त्यानंतर ठाकरे गटांनी न्यायालयीन लढाई सुरू केली शिवसेना ठाकरे घटाने जुलै २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पक्ष नाव आणि चिन्ह. देण्यासंदर्भात अंतिम अर्ज केला होता यामध्ये महाराष्ट्रात रमेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव ,शिवसेना. पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे गोठवण्यात यावे अशी मागणी केली होती यावर ऑगस्ट महिन्यात होणारे होणार होती मात्र ती लांबीवर पडली अखेरती सुनावणी ८ ऑक्टोबर२०२५ रोजी. सर्वोच्च न्यायालयात आयोजित केली होती मात्र आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ती आता १२ नोव्हेंबर पासून. घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर ही सुनावणी होईल का? मी पुन्हा तारीख पे तारीख मिळणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे