ठाणे : साप्ताहिक पत्रकारितेतील बदलती आव्हाने, डिजिटल युगातील माध्यमांची भूमिका, संपादकांचे हक्क व समस्या यावर सखोल चर्चा करण्यासाठी साप्ताहिक संपादक असोसिएशन (महाराष्ट्र) यांच्या वतीने राज्यस्तरीय साप्ताहिक संपादक कार्यशाळा व अधिवेशन–२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
ही निःशुल्क कार्यशाळा शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ठाणे पश्चिम येथील मराठी ग्रंथ संग्रहालय (मामलेदार कार्यालयाजवळ) येथे होणार आहे.
कार्यशाळेत साप्ताहिक पत्रकारितेतील बदलती आव्हाने, डिजिटल माध्यमांशी जुळवून घेण्याचे मार्ग, संपादकांचे हक्क व अडचणी, राज्यस्तरीय मुक्त चर्चा व ठराव, तसेच ज्येष्ठ संपादक व तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांचा समावेश असणार आहे.
या अधिवेशनास ज्येष्ठ संपादक, अनुभवी पत्रकार, माध्यम व कायदे क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच साप्ताहिक संपादक असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून मान्यवरांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत.
महाराष्ट्रातील सर्व साप्ताहिक संपादकांनी या अधिवेशनास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सहभागासाठी २० जानेवारी २०२६ पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीसाठी ९३२३२७६६१३ / ९२२१११७६८४ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.