सहकार समृद्धी पॅनेलच्या मागे ताकदीने उभे राहा; कपबशीला मतदान करा! आ. दरेकरांचे आवाहन

 

मुंबई – दि बेस्ट एम्प्लॉइज को-ॲाप. क्रेडिट सोसायटी लि. श्रमिक उत्कर्ष सभा प्रणित सहकार-समृध्दी पॅनेलच्या उमेदवारांचा प्रचार करत असताना भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर व आ. प्रसाद लाड यांनी परळ येथील बेस्ट कर्मचारी वसाहतीची पाहणी केली. यावेळी तेथील नागरिकांशी संवाद साधताना व सहकार-समृध्दी पॅनेलच्या उमेदवारांच्या पाठीशी ताकदीने उभे राहून कपबशीला मतदान करा, असे कळकळीचे आवाहन आ. दरेकर यांनी कामगारांना केले.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्षा शलाका साळवी, युनियनचे नेते साळवी, पवार, घाडीगावकर यांसह सहकार-समृद्धी पॅनेलचे सर्व उमेदवार व बेस्ट वसाहतीतील कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बेस्ट वसाहतीतील कामगारांना संबोधित करताना आ. दरेकर म्हणाले कि, २५ वर्षानंतर सत्ता उलथविण्याचा निर्णय बेस्ट कामगारांनी घेतलाय. बेस्ट कामगार सेनेने कामगारांसाठी काय केले याच्या पाच गोष्टी सांगितल्या तर आम्ही निवडणुकीतून माघार घेऊ. २५ वर्ष कामगारांसाठी काही केले नाही. कामगारांना सवलती, घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असे काही केले नाही. कामगारांच्या कष्टाचा, घामाचा पैसा खाण्याचे काम केवळ सुहास सामंत आणि त्यांच्या पिलावळीने केलेय असा आरोप करत आम्ही तुम्हाला द्यायला आलोय. केवळ द्यायला आलो नाही तर करून दाखवले आहे. ५२ कोटींचा कोविड भत्ता देण्याचे काम प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने झालेय. जसे गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जागेवर घरं मिळत असतील तर बेस्ट वसाहतीत राहणाऱ्या बेस्ट कामगारांनाही घर मिळाले पाहिजे, असेही दरेकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले कि, मी एसटी कामगाराचा मुलगा आहे. मला त्यांच्या व्यथा माहित आहेत. आम्ही तुम्हाला मेडिक्लेमसह कामावर असताना मृत्यू झाला तर १० लाखाची भरपाई, अत्यल्प व्याजदरात घरासाठी आपली पतपेढी व जिल्हा बँक एकत्रितपणे देणार आहोत. आम्ही पोपटपंची करत नाही तर काम करून दाखविणारे आहोत. बेस्ट कामगार सेनेने २५ वर्षात कामगारांना केवळ लुटण्याचे काम केले. बंगले बांधले ते त्यांच्या ऐय्याशीसाठी. त्यांनी एकाचे दोन बंगले केले. क्षणभर विश्रांती झाली. पण अजूनही बेस्ट कामगारांच्या घरावर छप्पर नाही. त्याचे यांना काही देणेघेणे नाही. त्यांची भावना चांगली नाही. पतपेढीतील भ्रष्टाचार प्रकरणाची ईओडब्ल्यूमार्फत चौकशी लावण्यात आली असून जे या कामगारांच्या जीवावर ऐय्याशी करत होते त्यांना जेलमध्ये जावे लागणार आहे. त्यांनी सर्व हत्यारे टाकलेली असल्याचेही दरेकर म्हणाले.

बेस्ट कामगारांच्या घरासाठी लाड समिती करावी

दरेकर म्हणाले कि, मुंबई जिल्हा बँकेने स्वयंपुनर्विकास योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून मुंबईत २० इमारती उभ्या राहिल्या आहेत. मोठ्या घरात सर्वसामान्य मुंबईकर मराठी माणूस राहायला गेला. जशी स्वयंपुनर्विकासासाठी दरेकर समिती केली तशी बेस्ट कामगारांच्या घरासाठी लाड समिती करावी. जेणेकरून बेस्ट कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागेल असेही दरेकर म्हणाले.

…तर कामगार नागाचा फणा ठेचून काढतील

दरेकर म्हणाले कि, नागे यांच्या युनियनने त्यांच्या बॅनरवर माझा फोटो लावला आहे. मी प्रसाद लाड यांचा प्रचार करतोय आणि त्यांच्या बॅनरवर माझा फोटो ही फसवेगिरी आहे. यांच्यावर ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करायला हवा. नाव नागे आहे, नागासारखा फणा काढू नका अन्यथा हे कामगार तुमचा फणा ठेचून काढल्याशिवाय राहणार नाहीत, असा गर्भीत इशाराही दरेकरांनी दिला.

बेस्ट कामगार सुहास सामंत यांना

क्षणभर नाही, कायमची विश्रांती देणार

दरेकर म्हणाले कि, प्रत्येक डेपोत आज कप बशीचे वारे आहे. २१ च्या २१ जागा समृद्धी पॅनेलच्या येणार. उत्कर्ष पॅनेलने कुठल्या कामगारांचा उत्कर्ष केला. फक्त उत्कर्ष सुहास सामंत यांचा झाला. बंगले बांधले, क्षणभर विश्रांती केली. आता क्षणभर नाही तर बेस्ट कामगार तुम्हाला कायमची विश्रांती दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोलाही लगावला. तसेच आम्ही कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, कामगारांच्या कुटुंबाच्या आरोग्याची, निवृत्तीनंतर दुर्लक्षित बेस्ट कामगारांना आधार वाटेल अशा निवृत्तीच्या योजना या पतपेढीच्या माध्यमातून, जिल्हा बँकेच्या आशीर्वादाने आणि सरकारच्या सहकार्यातून आणू, असा विश्वासही दरेकर यांनी कामगारांना दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *