महाड( मिलिंद माने) शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीकडून साजरा केला जातो या सोहळ्यासाठी मागील वर्षाचा गर्दीचा उच्चांक मोडून रेकॉर्ड ब्रेक गर्दी करण्याचा इरादा असून त्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विशेष उपस्थितीमुळे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
छत्रपतींची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे शिवजयंती पेक्षाही किंचित अधिक कारण या दिवशी राजमाता जिजाऊ मासाहेब व महाबली शहाजीराजे यांचे स्वप्न सत्यात उतरले शिवाजी महाराज’ छत्रपती ‘ जाहले इथल्या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात बंड करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःचे स्वराज्य स्थापन केले या सर्व होम स्वराज्याचे ते अधिपती होते ही बाब सामान्य नाही भूमिपुत्राचा हा खरा स्वातंत्र्य दिन असल्याने या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड वर दरवर्षीप्रमाणे यावर्षी दुर्गराज रायगड वर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या हर्षलहासात साजरा होणार आहे या सोहळ्याला मार्गदर्शक म्हणून संभाजीराजे छत्रपती यांच्याप्रमाणे संघर्ष योद्धा मनोज जिरांगे पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे
किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमुळे राज्याच्या विदर्भ, मराठवाडा ,उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, यासह मुंबई ,ठाणे, पुणे व कोकणातून. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रायगडावर उपस्थित राहणार असल्याने मागील वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला असलेल्या गर्दी पेक्षा चालू वर्षी गर्दीचा विक्रम मोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे यास सोहळ्याला शिवप्रेमी बांधवांनी व मराठा सेवकांनी उपस्थित राहावे व गडावर शिस्त व नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे