मिरा-भाईंदर शहर सुंदर ठेवण्यासाठी विशेष जागरूकता मोहीम
मिरा भाईंदर: मिरा भाईंदर महानगरपालिका शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. महानगरपालिका विविध नवे आणि अभिनव उपक्रम राबवत आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण होईल. यासाठी शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांना सक्रियपणे सहभागी होण्यासाठी महापालिका वेळोवेळी आवाहन करत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत नागरिकांना फीडबॅक नोंदवण्याची सुवर्णसंधी
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ साठी केंद्रीय मंत्रालयाने एक नवा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांना क्यूआर कोड स्कॅन करून आपल्या मतांचा (फीडबॅक) नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये मिरा भाईंदर महानगरपालिका देखील सक्रियपणे सहभागी झाली असून, नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या फीडबॅक लिंक किंवा क्यूआर कोड स्कॅन करून नागरिक आपला अभिप्राय सहजपणे नोंदवू शकतात. नागरिकांचा अभिप्राय हा स्वच्छ सर्वेक्षण मूल्यांकनासाठी महत्त्वाचा घटक ठरतो.
1. कधीच तुम्हाला तुमच्या घर/दुकानातून कचरा उचलण्यासाठी एखादी व्यक्ती येते का?
2. तुमच्या आवासीय क्षेत्रातील स्वच्छतेचे आणि नियमित सफाई कामाचे तुम्ही किती प्रमाणात मूल्यांकन करता?
3. तुमच्या क्षेत्रात किती वेळा, कुठे-कुठे कचरा दिसतो?
4. तुम्ही तुमच्या घरात असलेला कचरा सूखा आणि ओला असा वेगळा करतात का?
5. कचरा संकलक कचरा वेगळ्या श्रेणीत वर्गीकरण करून वाहने लोड करतो का किंवा सगळा कचरा एकत्र करून ठेवतो का?
6. तुम्हाला काय वाटते की स्थानिक अधिकारी सार्वजनिक स्थळे जसे की बाजार, उद्याने, सार्वजनिक बागा किंवा अन्य ठिकाणे स्वच्छ ठेवण्यात किती प्रभावी आहेत?
7. कचरा व्यवस्थापनासाठी रिड्यूस, रीयूज, रीसायकल केंद्रे आहेत का..? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
8. तुम्हाला माहिती आहे का की नगरपालिकेने सीवरेज आणि सॅनिटेशन टैंक साफ करण्यासाठी फक्त प्रमाणित ऑपरेटरचं कामावर ठेवावे का ?
9. तुम्ही तुमच्या क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांच्या साफसफाई आणि देखभालीबद्दल किती समाधानी आहात?
10. तुम्ही कधी स्थानिक प्रशासनाला स्वच्छतेशी संबंधित समस्या नोंदवली आहे का, आणि त्यावर कोणते उपाय करण्यात आले?
नागरिकांचा सहभाग अत्यंत आवश्यक
महापालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले आहे. या मोहिमेतील नागरिकांचे अभिप्राय संकलित करून, स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये उत्तम गुण मिळविणे आणि शहराची स्वच्छतेची स्थिती सुधारण्यात मदत होईल. मिरा-भाईंदर महानगरपालिका ही शहरी स्वच्छतेसाठी एक महत्वाची भूमिका निभावत असून, नागरिकांना त्यांच्या कामामध्ये सहकार्य करण्याची आवाहन केली आहे.
नागरिकांनी सदरच्या प्रश्नांची अचूक आणि योग्य उत्तरे देऊन आपला अभिप्राय नोंदवावा, आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तुम्हीही सहभागी व्हा!
QR कोड स्कॅन करून किंवा महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकवर जाऊन आपला अभिप्राय नोंदवा आणि मिरा-भाईंदर शहर स्वच्छ ठेवण्याच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेत सहभागी व्हा!