शिवसेना शाखाप्रमुख सुभाष येरुणकर यांचा आ. प्रविण दरेकरांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

मुंबई – शिवसेना शाखा क्रमांक ११ चे शाखाप्रमुख सुभाष येरुणकर यांनी त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आ. दरेकर यांनी भाजपचा झेंडा हाती देत येरुणकर व त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षात सामील करून घेतले आणि जिथे जिथे सहकार्य लागेल तिथे निश्चितच सोबत असेन असा विश्वास दिला.

 

यावेळी शाखाप्रमुख सुभाष येरुणकर यांच्यासह महिला कार्यालय प्रमुख कुंदा अरुण येरुणकर, उपशाखाप्रमुख पांडुरंग जाधव, संतोष खांडेकर, अनिल येरुणकर, विजय सावंत, धायबा परब, राजू वाईकर, शंकर भावके, मारुती गोपाळ, अविनाश भोसले, प्रमोद खेडेकर, नितीन सावंत, संजय कामे, मधू कांबळे, बजरंग लोहेकर, अश्विनी भरती, संजना सावंत, सरस्वती शृंगारे, महेंद्र गिते, किशोर जाधव, किरण परमार, विशाल भोसले यांसह असंख्य पदाधिकारी, गटप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. सदर प्रसंगी भाजपा मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा उत्तर मुंबई माजी अध्यक्ष गणेश खणकर, भाजपा माजी विभाग अध्यक्षा रश्मी भोसले, मंडल अध्यक्षा सोनाली नखुरे, मंडल अध्यक्ष अमित उतेकर, उत्तर मुंबई जिल्हा सचिव मोतीभाई देसाई यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

येरुणकर यांच्या पक्ष प्रवेशावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, एखाद्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशासाठी इतकी गर्दी जमा होणे हा त्या कार्यकर्त्याचा लोकांमध्ये असणारा वावर आणि संपर्क याचे उदाहरण आहे. आपल्या हातून ज्या समाजहिताच्या गोष्टी आहेत त्या घडो. काजूपाड्यात लोकांना बनवाबनवी करण्याचे दिवस संपलेत. मक्तेदारी समजणाऱ्यांची शंभर टक्के मक्तेदारी मोडून टाकणारा हा प्रवेश सोहळा असल्याचे दरेकर म्हणाले.

 

दरेकर पुढे म्हणाले कि, भाजपा एवढा चांगला पक्ष सर्वसामान्यांचे काम करण्यासाठी दुसरा असूच शकत नाही. या पक्षात कार्यकर्ता छोटा मोठा असो जो काम करतो तो पुढे जातो. पक्षात इमानदारीने जनतेसाठी काम करावे लागते हे संस्कार पक्षाने दिलेत. पक्षाचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. २४ तास माझा देह, माझे सर्वस्व देशासाठी आहे. जगाच्या बाजारात देशाची प्रतिष्ठा वाढली पाहिजे हे समजणारा, कृतीत उमटवणारा नेता आपल्या पक्षाचे वैभव आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून देवेंद्र फडणवीस २४ तास काम करताहेत. माझा महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे, माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक आली पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे यादृष्टीने ते काम करताहेत. आज मुंबई आंतरराष्ट्रीय स्तरावर बदलताना दिसतेय. मुख्यमंत्री स्वतःहून यासाठी परिश्रम घेत असल्याचेही दरेकर म्हणाले. यावेळी दरेकर यांनी लाडक्या बहिणींसाठी मुंबई बँकेमार्फत बिनव्याजी कर्ज योजना आणली असल्याचेही सांगितले. तसेच महिलांनी समाजात मान, प्रतिष्ठा मिळेल असे काम करावे. बचतगट, महिला संघटनांना जे सहकार्य लागेल ते करण्याचा शब्दही दरेकरयांनीदिला.

 

*माणूस लांब गेला कि किमत कळते*

 

दरेकर म्हणाले कि, माणूस जवळ असतो, काम करतो, राबतो तेव्हा त्याची किंमत नसते. मात्र तो दूर गेला कि त्या मौल्यवान माणसाला गमावल्याची किंमत कळते. जबरदस्तीने कुणाला पक्षात घेणे, पक्ष फोडणे ही माझी प्रवृत्ती नाही. एखादा कुणीतरी येतो व आपल्या व्यक्तिगत कौटुंबिक स्वार्थासाठी शेकडो कार्यकर्त्यांना भीक घालत ननसेल तर त्याचेही उत्तर देण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून आपली ठरते व ते उत्तर आज सुभाष येरुणकर यांनी दिल्याचे दरेकर म्हणाले.

 

*जिथेजिथे मार्गदर्शन लागेल तिथे सोबत असेन*

 

दरेकर म्हणाले कि, सुभाष येरुणकर यांना कोणते राजकीय पद देईन माहित नाही, पण त्यांना एवढी ताकद देईन कि तुमच्या हातून या समाजाचे, काजूपाड्याचे भलं होईल. निष्ठेने, प्रामाणिकपणे पक्षाचे काम करा. कुठलाही नेता एकटा मोठा होत नसतो ज्यावेळी आपल्या सहकाऱ्यांना मोठा करतो त्यावेळी तो नेता आणखी मोठा होतो. कामाचे नियोजन करा, जिथे जिथे मार्गदर्शन, सहकार्य लागेल तिथे निश्चितच मी सोबत असेन, असा विश्वासही दरेकरांनी उपस्थितांना दिला.

 

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले नेतृत्व*

 

दरेकर म्हणाले कि, शिवसेनेशी वाद नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व चांगले आहे. माझे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. परंतु एवढे कार्यकर्ते नाराज असतील तर त्या कार्यकर्त्यांनाही व्यासपीठ पाहिजे. कार्यकर्ते विखूरले जाण्यापेक्षा आपल्याच घरात राहत असतील व त्याचा उपयोग आपल्या विचारधारेशी होत असेल तर ते चांगलेच आहे. पक्षाची, हिंदुत्वाची विचारधारा आपल्या कामातून पुढे न्यायची असल्याचेही दरेकरांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *