महाड : (मिलिंद माने ) मे महिन्यातच घाट विभागात मोठ्या प्रमाणात मेंढी पालन केली जाते कोकणातील पावसाळा संपल्या संपल्या मेंढपाळ आपली मेंढ्या कोकणात घेऊन येतो जवळ पास आठ महिने कोकणात काढून जून महिन्यामध्ये आपल्या गावी जातो यंदा मे महिन्यात चालू झालेल्या पावसामुळे एक महीना अगोदरच. मेंढपाळांनी आपला परतीचा प्रवास सुरु केला आहे
मे महिन्यामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे मेंढपाळ वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.. घाट विभागातून दरवर्षी शेकडो मेंढपाळ लाखो मेंढ्यांना केवळ चाऱ्या साठी कोकणात घेऊन येतात कोकणातील पाऊस सुरु होण्या पूर्वी जून महिन्यात आपल्या गावी परतीचा प्रवास करतात
कोकणात येणाऱ्या . या मेंढपाळांना कोकणात खाद्य सह आठ महिने चांगली मेंढ्यापासून कमाई देखील होते कोकणातील शेतकरी आपल्या शेतामध्ये या मेंडन पासून खत मिळत असल्याने कोकणातील शेतकरी या मेंढपाळ यांना त्याचा मोबदला देतात
कोकणातील शेतकरी मोबदल्यात भात किंवा पैसे देतो कारण मेंढयांच्या लेंड्यांपासून भात शेती उत्तम दर्जाची पीक देते. शेतकऱ्यांचे काम होते आणि या मेंढपालांची देखील वर्षाची कमाई होत असते त्यामुळे मेंढपाळ दरवर्षी आपल्या कुटुंबा सह कोकणात जून महिन्या पर्यंत वेगवेगळ्या तालुक्यातील गावांमध्ये ठाण मांडून असतो. यंदा मे महिन्यातच पावसाने सुरवात केली आहे त्या मुळे मेंढपाळ निराश होऊन परतीच्या प्रवासाला निघाला आहे
कोकणात मे महिन्यात चालू झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या मेंढपाळ वर्गाला देखील बसला आहे.कारण दर वर्षी मेंढपाळ जून महिन्यात गावी परत्तो या मुळे त्याच्या गावी गेल्यानंतर या मेंढपाळांना एक महिना चा मेंढ्या साठी चाऱ्याचा बंदोबस्त करावा लागणार आहे.