कोल्हापूर – कोल्हापुरात झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांना जवळ बोलावून स्वयं-समूह पुनर्विकास योजनेविषयी सविस्तर माहिती घेतली.
पवार यांनी या उपक्रमाच्या प्रक्रिया, अंमलबजावणी आणि प्रगतीविषयी माहिती जाणून घेतली तसेच या संदर्भातील माहिती पुस्तिका मागवली.
यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी पवार यांना सांगितले की, “मी स्वतः येऊन आपणांस भेटून स्वयं-समूह पुनर्विकास योजना प्रत्यक्षात कशी साकार होते याची सविस्तर माहिती देईन,” असे आश्वासन त्यांनी दिले.
या चर्चेमुळे या योजनेविषयी राज्यातील सर्वच राजकीय पातळ्यांवर नव्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.