आपला रुपेश फाउंडेशन व मुंबई जिल्हा बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंपुर्नविकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

मुंबई : मुंबईतील जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अनेक अडचणींमुळे रखडत आहे. या पार्श्वभूमीवर हाऊसिंग सोसायट्यांना आर्थिक व तांत्रिक सहाय्य देण्याच्या हेतूने मुंबई जिल्हा सहकारी बँकेने ‘स्वयंपुनर्विकास कर्ज योजना’ राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांचा पुनर्विकास स्वतः करणे शक्य होऊ लागले आहे.

आतापर्यंत १६०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांनी या योजनेसाठी मुंबई बँकेशी संपर्क साधला आहे. यातील २२ प्रकल्पांना मंजुरी, १५ सोसायट्यांना एकूण २५६ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. यापैकी ७ प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाले असून, त्यांच्या नव्या इमारती उभ्या राहिल्या आहेत.

या यशस्वी अनुभवांच्या पार्श्वभूमीवर, आपला रुपेश फाउंडेशनमुंबई जिल्हा बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंपुर्नविकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दिनांक ३१ मे रोजी सकाळी १० वाजता डोंगरी येथील सेंट जोसेफ गर्ल्स हायस्कूल सभागृहात होणार आहे.

प्रमुख पाहुणे:

  • मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर

या शिबिरात दक्षिण मुंबईतील उमरखाडी, डोंगरी, चिंचबंदर परिसरातील म्हाडाच्या, खाजगी मालकीच्या धोकादायक, पागडी व बीपीटी इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय, मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्याने यशस्वीपणे पुनर्विकास पूर्ण केलेल्या प्रकल्पांचा लेखाजोखा शिबिरात सादर केला जाईल.

शिबिराचे वैशिष्ट्ये:

  • पुनर्विकासाच्या कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन

  • स्वयंपुर्नविकासासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती

  • यशस्वी प्रकल्पांचे प्रातिनिधिक उदाहरण

  • मुंबई जिल्हा बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज सवलती व अटी

या मार्गदर्शन शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आपला रुपेश फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. रुपेश पाटील यांनी केले असून, इच्छुकांनी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा:

संपर्क:

  • रुपेश पाटील (आपला रुपेश फाउंडेशन अध्यक्ष) – ९८६७८९९९५९

  • श्रीधर जगताप (मुंबई सहकारी बोर्डाचे सहसचिव) – ९८९२०८६९६९

  • कमलेश भोईर – ७७१५०६०८०६

  • निलेश घोडके – ९७०२५७१३८६

  • मिलिंद कारेकर (पत्रकार) – ९९२०९५५६२७

मुंबईतील जुन्या व धोकादायक इमारतींचा पुनर्विकास ही काळाची गरज आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन आपल्या इमारतीच्या स्वयंपुर्नविकासाचा मार्ग निवडण्यासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *