‎अनुसूचित जाती आयोगाचा २७ ऑक्टोबर रोजी मीरा-भाईंदर महानगरपालिकेला दौरा

 

‎मीरा-भाईंदर – ‎महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग, मुंबई यांच्या वतीने दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी मीरा-भाईंदर महानगरपालिकेला अधिकृत दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात आयोगाचे उपाध्यक्ष मा. अॅड. धर्मपाल मेश्राम, तसेच सदस्य (सचिव दर्जा) मा. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सहभागी राहणार आहेत.

‎‎या संदर्भात महानगरपालिकेच्या उपआयुक्त (मुख्यालय) कपिला पिंपळे यांनी सर्व विभागप्रमुखांना सूचना देत पत्र जारी केले आहे. आयोगाचा दौरा सकाळी ९.३० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आयोजित करण्यात येणार आहे.

‎या भेटी दरम्यान आयोगाचे सदस्य शहरातील अनुसूचित जाती समाजासंबंधी विविध प्रश्न, तक्रारी आणि शासकीय योजना अंमलबजावणीची स्थिती यांचा आढावा घेणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

‎‎प्रशासनाकडून सर्व विभाग प्रमुख व अधिकारी यांना वेळेवर उपस्थित राहण्याच्या व आवश्यक माहितीची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *