महाड( विशेष प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिसऱ्या टप्प्यातील म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महसूल यंत्रणा कामात व्यस्त असल्याने याचाच गैरफायदा घेत दिवसाढवळ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील केभुर्ली जवळ सावित्री खाडीपात्रातून पोकलेन मशीनच्या साह्याने वाळू फस्त करण्याचे काम होत असल्याचे उघड झाले आहे
स्थानिक स्वराज्य संस्थेतील तिसऱ्या टप्प्यातील म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम महाडमध्ये मोठ्या प्रमाणावर चालू असून या निवडणुकीच्या तयारीसाठी संपूर्ण महसूल खाते निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा रेतीमाफी यांनी घेतला दिवसाढवळ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील केबुर्ली जवळील हॉटेल रिद्धेश ला लागून असलेल्या सावित्री खाडीपात्रात पोकलेन मशीनच्या साह्याने नदीपात्रातून रेती काढून तिथे डंपर मध्ये भरून परस्पर विक्रीसाठी नेत असल्याचे उघड होत आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील केभुर्ली ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल रिद्धेश ला लागून असलेल्या सावित्री खाडीपात्रातून विनापरवाना वाळूची दिवसाढवळ्या चोरी करीत असताना तलाठी व मंडळाधिकारी मात्र डोळ्यावर काळी पट्टी बांधून झोपलेत का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे याबाबत तलाठी सागर पवार यांना विचारले असता असा कोणताही प्रकार चालू नसल्याचे सांगून तिथे डेझर मार्फत रेती काढण्याचा परवाना दिला आहे असे सांगून या संदर्भात बातमी आल्याने आम्हाला काही फरक पडत नाही असे उत्तर त्यांनी दिले त्यामुळे रेती चोरीच्या व्यवसायात चक्क तलाठी व मंडळ अधिकारी देखील समाविष्ट आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे