बोरिवलीत रायगड प्रतिष्ठानतर्फे भव्य ‘रंगरास’ गरब्याचे आयोजन

 

सुप्रसिद्ध गायिका भूमी त्रिवेदी मंत्रमुग्ध करणार – भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांची माहिती

 

मुंबई – गेली तीन वर्ष सातत्याने रायगड प्रतिष्ठानच्या वतीने बोरिवली पश्चिम येथील बाळासाहेब ठाकरे मैदानात नवरात्रौत्सवानिमित्त ‘रंगरास’ गरब्याचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षीही ‘तोच उत्साह, त्या जल्लोषा’ सह या गरब्याचे आयोजन करण्यात आले असून गरबा रसिकांना सुप्रसिद्ध गायिका भूमी त्रिवेदी मंत्रमुग्ध करणार असल्याची माहिती भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिली.

 

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देताना आ. दरेकर म्हणाले कि, सलग चौथ्या वर्षी रंगरास नवरात्रौत्सव बोरिवलीमध्ये साजरा करीत आहोत. नवरात्रीत ज्यांचे खास आकर्षण असते त्या प्रख्यात गायिका भूमी त्रिवेदी या गेली तीन वर्ष चांगला परफॉर्मन्स करून या उत्सवाची शान वाढवत असतात. हा उत्सव बोरिवली (पश्चिम) ला बाळासाहेब ठाकरे मैदानात पार पडणार आहे. मुंबईत रंगरास गरब्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. रास गरब्याची राणी म्हणून ओळखली जाणारी भूमी त्रिवेदी आपला परफॉर्म करणार आहेत. नवरात्रीत रसिकांना दररोज सादरीकरणातून मंत्रमुग्ध करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

 

ते पुढे म्हणाले कि, गायिका भूमी त्रिवेदी यांनी रामलीला चित्रपटातील ‘राम चाहे लीला चाहे‘, रईस मधील ’उडी उडी जाये‘, तसेच अनेक प्रसिद्ध गाण्यांमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली आहे. त्यांच्या सुमधुर आवाजामुळे प्रत्येक राज्य संगीत आणि आवाजामुळे उधळून निघणार आहे. नृत्य, संगीत आणि परंपरेचा भव्य असा संगम दिसणार आहे. अखंड ९ दिवस रास गरब्याचे थेट प्रक्षेपण असणार आहे. सुरक्षा व्यवस्था, आसन व्यवस्था, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, बक्षिसे चित्रपट, टीव्ही आणि संगीत क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्ती, राजकीय क्षेत्रातील मान्यवर नेते उपस्थित राहून गरब्याची शोभा वाढवीत असतात. उपनगरातील मोठे आकर्षण भूमी त्रिवेदी परफॉर्मन्स करत असलेल्या रायगड प्रतिष्ठानच्या गरब्याचे असते. आयोजक डॉ. यश प्रविण दरेकर, पिनाकीन शहा, प्रकाश दरेकर हे योग्य प्रकारचे गरब्याचे नियोजन करत असतात,असेही दरेकर म्हणाले.

 

तर भूमी त्रिवेदी यांनी म्हटले कि, चांगली भूमिका घेऊन आम्ही रसिकांना गरबा खेळण्यासाठी आमंत्रित करतो. प्रोडक्शनसह म्युजिक वर आम्ही लक्ष केंद्रित केलेय. नक्कीच गरबा रसिकांना याचा आनंद घेता येईल. हा आनंदाचा उत्सव आहे. गरब्याची गाणी आणि फोक संगीतासह आम्ही रसिकांच्या भेटीला येणार आहोत. या वर्षभरात जी गाणी बाहेर आली आहेत त्यांचाही यामध्ये समावेश केला असल्याचेही भूमी त्रिवेदी म्हणाल्या. यावेळी आभार प्रदर्शन डॉ. यश प्रविण दरेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *