मिरा भाईंदर – मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील तत्कालीन जनमाहिती अधिकारी राजकुमार कांबळे (सेवानिवृत्त) यांच्यावर माहिती न दिल्याबद्दल ₹२५,०००/- शास्तीची कारवाई राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठामार्फत करण्यात आली आहे.
तक्रारदार तुषार यशवंत गायकवाड यांनी २६ जुलै २०२१ रोजी माहितीचा अर्ज दिला होता. त्यानंतरही अधिकारी यांनी माहिती दिली नाही, त्यामुळे आयोगाने पूर्वी नोटीस देऊन लेखी खुलासा मागवला होता. मात्र अधिकारी अनुपस्थित राहिले व खुलासा न दिल्यामुळे आयोगाने थेट दंडाची कारवाई केली आहे.
आरटीआय कायदा २००५, कलम २०(१) अंतर्गत ही शास्ती लादण्यात आली असून, ती ५ मासिक हप्त्यांत वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करणारी ठरली असून, नागरिकांना माहिती मिळण्याच्या हक्काला बळकटी मिळाली आहे.