उत्तन येथे अत्याधुनिक जेट्टी उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ -परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांची ग्वाही
उत्तन : ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक मासेमारी नौका या उत्तन मध्ये असल्यामुळे तेथे एक चांगली अत्याधुनिक जेट्टी उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते उत्तन येथे भरवण्यात आलेल्या लोक दरबारामध्ये बोलत होते. यावेळी मीरा -भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खात्याचे अधिकारी आणि उत्तन मधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोक दरबारामध्ये आपल्या समस्या उत्तनवासी यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर मांडल्या. उत्तन, पाली,चौक, डोंगरी गावांचा सीटी सर्व्हे करण्याबाबत आग्रही मागणी केली.यावर मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्वे करण्याच्या सूचना दिल्या.याबरोबरच ड़पिंग ग्राऊंड वरील कचरा कमी करणे.खाडीत वाहून येणाऱ्या सांडपाण्याचा निचरा करणे, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
सदर प्रसंगी उपस्थित आयुक्त संजय काटकर, एमएमआरडीए अति. आयुक्त राधा बिनोद शर्मा, पोलिस उप आयुक्त प्रकाश गायकवाड,शहर अभियंता दिपक खांबीत, सहा. संचालक नगर रचना,पुरुषोत्तम शिंदे, दिनेश पाटील, सह आयुक्त, मत्सव्यवसाय, सचिन बांगर – उप आयुक्त, सुरेखा पवारः पतत्व व्यवस्थापन अभियंता., गिल्बर्ट मैडोसा, – माजी आमदार, राजू भोईर, जिल्हाप्रमुख’’ मिरा भाईंदर शहर, निशा नार्वेकर, महिला जिल्हा संघटक’’ मिरा भाईंदर शहर, विक्रमप्रताप सिंह, मिरा भाईंदर शहर ‘’१४५ विधानसभा क्षेत्रप्रमुख, पुजा आमगावकर, ‘’१४६ ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ मिरा भाईंदर शहर शिवसेना महिला संघटक , एलएस बंड्या, माजी नगरसेवक, धनेश पाटील, माजी नगरसेवक, प्रवीण पाटील, माजी नगरसेवक, शर्मिला बजाजी, माजी नगरसेविका, अरविंद ठाकुर, माजी नगरसेवक, तारा घरत, माजी नगरसेविका, संध्याताई पाटील, माजी नगरसेविका, जयंतीलाल पारील माजी नगरसेवक, पप्पू भिसे उपजिल्हाप्रमुख भाईंदर पश्चिम, मयुरेश वाघ, मिरा भाईंदरशहर समन्वयक आदी उपस्थित होते.