परभणी येथील घटनेचा मिराभाईंदर मधील संविधानप्रेमी नागरिकांकडून निषेध आंदोलन

Spread the love

भाईंदर: प्रतिनिधी: परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीकात्मक प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी मिरा भाईंदर मधील संविधान प्रेमी जनतेने एकत्र येऊन निषेध नोंदवला. भाईंदर पश्र्चिम येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत विश्वनाथ तायडे, देवेंद्र शेलेकर, सुनिल कांबळे, सुभाष ठोंबरे, चंद्रमणी मनवर, अनिल भगत,अंकुश मालुसरे ,माधवी गायकवाड, संगीता धाकतोडे, सतीश तायडे,चीनाप्पा मोजेस, अश्विनी कांबळे,महेश खलसे आदींनी आपली निषेधात्मक मते व्यक्त कली. तसेच संविधान प्रेमी प्रमोद देठे ,उमेश शिंदे व आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा.उत्तम भगत यांनी समारोपीय भाषण करून मिरा भाईंदर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान यांच्या संदर्भातील कसलीही छेडछाड कदापिही सहन केली जाणार नाही ” अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. प्रा. सुनिल धापसे यांनी सूत्रसंचालन केलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून पंचशील त्रिशरण घेण्यात आले. प्रा. भास्कर पैठणकर यांनी संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन केले. निषेध सभेला मिरा भाईंदर मधील जनता उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *