ठाण्यात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश वर्तकनगर पोलिसांची पीटा अंतर्गत यशस्वी कारवाई

 

ठाणे : प्रतिनिधी – ठाणे शहरात वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने पीटा (PITA) कायद्यांतर्गत मोठी कारवाई करत देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका वकिल एजंटसह एका महिला दलालाला अटक करण्यात आली असून, आणखी एक महिला दलाल फरार आहे. या छाप्यात चार महिला मॉडेल्स व फोटोशूटसाठी वापरल्या जाणाऱ्या तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वर्तकनगर परिसरात देहव्यापार सुरू असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार सापळा रचून छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान मिश्रा नावाच्या वकिल एजंटला अटक करण्यात आली, तर रॅकेट चालवणाऱ्या एका महिला दलालालाही ताब्यात घेण्यात आले. मात्र, या प्रकरणातील आणखी एक महिला दलाल सध्या फरार असून तिचा शोध सुरू आहे.

छाप्यात अडकलेल्या चार तरुणींची सुखरूप सुटका करण्यात आली असून, त्यांना योग्य ती मदत व समुपदेशन देण्यात येत आहे. या प्रकरणी पीटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत.

ठाणे शहरात बेकायदेशीर देहव्यापाराविरोधात पोलिसांची कारवाई यापुढेही कठोरपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *