भाईंदर दि.२४- भाईंदर येथील शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्टच्या शंकर नारायण कला व वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत असलेल्या इतिहास विभाग प्रमुख प्रा. सुनील आत्माराम धापसे यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून नुकतीच पीएचडी पदवी बहाल करण्यात आली.
प्रा. सुनील आत्माराम धापसे यांनी “मुंबई महानगरपालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ऐतिहासिक कार्य” या विषयात संशोधन केले आहे . त्यांनी केलेल्या संशोधनाचा फायदा सामाजिक शास्त्र , मानव्यशास्त्र व आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांना व समाजाला नक्की होईल.
प्रा. धापसे हे मीरा-भाईंदरमधील विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्थेमध्ये गेल्या २५ वर्षांपासून सक्रिय आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन च्या माध्यमातून ते आपले शैक्षणिक योगदान देत असतात. ते धमसम्राट अशोक बुद्ध विहार व्यवस्थापन समितीचे सचिव असून धार्मिक कार्यातही सक्रिय आहेत. ते विविध सामाजिक उपक्रमातून मीरा भाईंदरमधील वंचित , दलित व कामगार वर्गासाठी सातत्यपूर्ण कार्यरत आहेत.
त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून त्यांनी आपले मार्गदर्शक डॉ. जे. एम. बोचरे, डॉ . एस . पी . टकले आणि डॉ. राहुल वरवंटीकर यांचे विशेष आभार मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. यादव यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. रोहिदास पाटील (काका), सचिव महेशजी म्हात्रे ,भूषण पाटील, पुरुषोत्तम पाटील, हितेंद्र पाटिल,सौ. कल्पनाताई म्हात्रे तसेच सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.