महाड (मिलिंद माने ) छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडचे दर्शन घेऊन घेऊन पुणे येथे निघालेल्या खाजगी बसला रायगड महाड रोडवरील घरोशी वाडी येथे वेगात असताना बस उलटल्याने झालेल्या अपघातात ३२ प्रवाशांपैकी ११ जण जखमी . झाल्याची घटना सायंकाळी घडली
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड वर पावसाळी पर्यटन करून पुण्याकडे परतणाऱ्या खाजगी आराम बस क्रमांक एम एच १४ के ए ७२४५ या गाडीला महाडच्या हद्दीवर घरोशी वाडी येथे दुपारी चारच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये बस. मधून प्रवास करणाऱ्या ३२ प्रवाशांपैकी ११ जण जखमी झाल्याची माहिती पाचाड आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.
या अपघाताचे वृत्त समजतात महाड तालुका पोलीस स्टेशन व पाचाड दूर शेत्र स्थानकातील पोलीस स्टेशनच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवासी वर्गाला तातडीने प्राथमिक केंद्रामध्ये आणण्याची सुरुवात केली पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शैलेश मालदे यांनी यासंदर्भात जखमी असलेले प्रवासी यांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीद्वारे बोलताना दिली आहे.
. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड येथे आज सकाळी पुणे येथून सुमारे ३२ असं क्षमता असलेल्या खाजगी आराम बस मधून पर्यटक प्रवास करीत होते. साधारणता दुपारी चारच्या सुमारास किल्ले रायगड येथून परतीच्या प्रवासात निघाल्यावर घरोशी वाडी येथे सदरचा अपघात झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाचाड आरोग्य केंद्राच्या सूत्रांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.
या बसमधून प्रवास करणाऱ्या जखमी व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे
१) अनिकेत आघाव २२ वर्ष
२) किरण घाविल २९वर्ष
३) आशिष अंभोरे २४ वर्ष
४) तुकाराम चोपडे २० वर्ष
५) भीमा कांबळे २१ वर्ष
६) तुळशीराम यादव १९ वर्ष
७) शिवानी जाधव २३ वर्ष
८) जानवी पारकर २४ वर्ष
९) माधुरी ठोकळ २० वर्ष
१०) दिव्या अहिल्या २९ वर्ष
११) तेजस पाटील