महाड (मिलिंद माने) मुंबई किंवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक६६ वर इंदापूर ते पेण या पट्ट्यात जागोजागी उड्डाणपूल ते सर्विस रोड व मूळ रस्त्यावर देखील खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावर पाळीव जनावर मोकाट कुत्र्यांचा संचार वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा कधी पूर्ण होणार असा प्रश्न कोकणातील चाकणमाऱ्यांना पडला असताना या रस्त्याचे मागील वर्षाचीच परिस्थिती जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झाली आहे गणपती सण अवघा दीड महिन्यावर येऊन ठेपला असताना या महामार्गाची चाळण झाल्याचे चित्र इंदापूर ते पेण या दरम्यानच्या रस्त्यांवर पाहण्यास मिळत आहे
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर. महाड पासून माणगाव पर्यंत मुख्य सिमेंट काँक्रीट चा रस्त्याला व उड्डाणपुलाला तडे गेले आहेतच परंतु इंदापूर पासून पेण पर्यंतच्या रस्त्याची अक्षरक्षा चाळण झाली आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी या पट्ट्यातल्या रस्त्यातल्या सर्विस रोडची व उड्डाणपुलावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे जागोजागी वाहन चालकांना यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस बंदिस्त कुंपण नसल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या गावांमधील पाळीव जनावरे व भटके स्वान हे जागोजागी महामार्गावर पाहण्यास मिळतात यामुळे वेगाने गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांना दोन्ही बाजूकडे बघूनच वाहन चालवावे लागत आहे यामुळे अनेक वेळा किरकोळ व गंभीर अपघात झाले आहेत मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यावर कोणतीच उपाय योजना करताना दिसत नाही
महामार्गावर व उड्डाण पुलावरील व सर्विस रोड वरील खड्डे कधी भरणार?
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर पासून पळस्पे फाट्यापर्यंत असणाऱ्या उड्डाणपूलांवर तसेच सर्विस रोडवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून ते खड्डे कधी भरणार असा सवाल या महामार्गावरून प्रवास करणारे लाखो प्रवासी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विचारीत आहेत मात्र या महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीला मात्र रस्त्यांवरील खड्डे व पुलांवरील खड्डे भरण्याचे का सौजन्य दाखवता येत नाही असा सवाल देखील विचारला जात आहे
महामार्ग सुरक्षा गस्त पथक केवळ वाहनांची तपासणी करण्यासाठीच आहे का?
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी पासून महाड जवळील केभुर्ली व नागोठणा जवळील जिंदाल कंपनीच्या जवळ असणाऱ्या महामार्ग सुरक्षा गस्त पथकाचे पोलीस वाहनांची तपासणी करण्याच्या नावाखाली केवळ महामार्गावर उभे असतात यांना महामार्गावरील खड्डे पडले आहेत यामुळे वाहतूक कोंडी होत आहे याबाबत वरिष्ठांकडे अहवाल द्यावा असे वाटत नाही का? वाहनांच्या तपासणीचा बागुल बुवा करून वाहन चालकांना नाहक त्रास देण्यापेक्षा राष्ट्रीय महामार्गावरील कोणकोणत्या भागात खड्डे पडले आहेत याचा रोजचा अहवाल महामार्ग सुरक्षा गस्त पथकातील वरिष्ठ अधिकारी का मागत नाही? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे