महाड (मिलिंद माने) महाड दापोली राज्य मार्गावर मे महिन्यात चालू झालेल्या अवकाळी पावसामुळे निसरडा झालेल्या रस्त्यावर अपघातांची मालिका चालू असून तब्बल दोन महिन्याचा कालावधी होत असताना काल मध्यरात्री एक सिमेंट काँक्रेट मिक्सर व मोटरसायकल निसर्गा रस्त्यामुळे घसरून झालेल्या अपघाताने पुन्हा या मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
महार दापोली राज्य मार्गावर शिरगाव फाट्यापासून लाटवण हद्दीपर्यंत मे महिन्यात अवकाळी पावसाने चालू झालेल्या अपघाताची मालिका तब्बल दोन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही चालू असल्याचा प्रत्येक सोमवारी मध्यरात्री महाड वरून दापोलीकडे जाणाऱ्या काँक्रीट मिक्सरचा MH.०८.४०५३ हा ट्रक वMH. ०२.DF.७१३ पल्सर कंपनीची एक दुचाकी चालक घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे मात्र रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका वृक्षामुळे सिमेंट काँक्रेट चा ट्रक उलटण्यापासून बचावला
महाड दापोली राज्य मार्गावर शिरगाव फाटा ते लाटवण पर्यंतच्या हद्दीच्या रस्त्याची देखभाल दुरुस्तीचे काम एफ एम सी कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे या कन्स्ट्रक्शन कंपनीने एप्रिल महिन्यामध्ये सुस्थितीत असणाऱ्या रस्त्यावर डांबर टाकून त्यावर ग्रिट टाकण्याचा उपद्याप केला यामुळे मूळ सुस्थितीत असणाऱ्या रस्त्यावर डांबरीचा मारलेला मुलामा हा तळपत्या उन्हामुळे वितळला व मे महिन्यापासून चालू झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर या डांबरातून ऑइल सदृश्य पडत असलेल्या फेसामुळे या रस्त्यावर तब्बल दोन महिने अपघातांची मालिका चालू झाली त्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाड यांनी या रस्त्यावर पुन्हा खडी टाकून रोलर ने दाबण्याचा व जेसीबी यंत्राने रस्त्यावर रेगोट्या मारण्याचे काम केले मात्र त्यामुळे देखील रस्ता गुळगुळीत होऊन अपघात मात्र थांबले नाहीत
महाड दापोली राज्य मार्गावर अपघाताची मालिका तब्बल दोन महिने चालू असताना या रस्त्यावर अपघात होऊ नये यासाठी स्पीड ब्रेकर टाकून वाहनांचा वेग मंदावण्याचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाड यांनी ठेकेदाराला सांगून केले मात्र तात्पुरती केलेल्या मलमपट्टीमुळे अपघातांची मालिका मात्र चालूच राहिली आहे याबाबत सुस्थितीत असणाऱ्या रस्त्यावर या एफएमसी कंट्रक्शन कंपनीने डांबर टाकून ग्रिट मारण्याचा का उद्योग केला ? याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाड मात्र ठेकेदारावर कोणती कारवाई करणार असा प्रश्न या अपघाताच्या मालिकांमधून उपस्थित होत आहे