गाडी भाड्याने लावून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणुक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई २४६ वाहने जप्त, २९ बँक खाती गोठवली, २ जणांना अटक

मिरा भाईंदर – काशीमीरा पोलिसांनी फसवणुकीच्या एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश करत मुख्य आरोपी संदिप सुरेश कांदळकर याच्यासह एकाला अटक केली आहे. ह्या आरोपींनी एअरपोर्ट आणि जेएनपीटीमध्ये गाड्या भाड्याने लावून दरमहा ५५ हजार ते ७५ हजार रुपये उत्पन्न मिळेल, असे आमिष दाखवून १३७५ लोकांकडून एकूण २० कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. काशीमीरा पोलिसांनी या आरोपींकडून सुमारे २५ कोटींच्या २४६ गाड्या जप्त केल्या आहेत.
काशी मीरा पोलिसांच्या ताब्यात असलेला मुख्य आरोपी संदीप सुरेश कांदलकर उर्फ राजीव जोशी याच्यावर याआधीच फसवणुकीचे १३ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी जोशी सामान्य नागरिकांना एअरपोर्ट आणि जेएनपीटीमध्ये त्यांची गाडी भाड्याने लावून दरमहा ५५ ते ७५ हजार रुपये उत्पन्न मिळवून देण्याचे आमिष दाखवत असे. या आरोपीने १३७५ लोकांकडून एकूण २० कोटी ६० लाख रुपये उकळले.

या प्रकरणात दोन आरोपींना अटक करून त्यांच्या माहितीवरून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातून २४६ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. इनोव्हा क्रिस्टा, मारुती ब्रेझा, बोलेरो पिकअप, किया क्रेन्स, मारुती अर्टिगा आणि महिंद्रा थारसारख्या महागड्या गाड्या या जप्त करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये आहेत. या गाड्यांची किंमत सुमारे २५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
फसवणूक करणारे आरोपी पीडितांकडून त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या कंपनीच्या नावावर गाड्या फायनान्स करून घेत असत. यासाठी ते पीडितांकडून रोख रक्कम घेत असत किंवा गाड्या थेट त्यांच्या नावावर काढत. काही पीडितांच्या मते, आरोपींनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून देण्याच्या नावाखालीही ३ ते ५ लाख रुपये उकळले होते.
आरोपींनी पीडितांकडून घेतलेली गाड्या आणि पैसे नेमके कुठे व कशासाठी वापरले ह्याबाबत
पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *