मीरा रोड : मीरा रोड पूर्व, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील MIDC रोड परिसरात असलेल्या ‘नेचरल थाई स्पा सेंटर’ मध्ये मसाज सेंटरच्या आड वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर काशीमीरा पोलिस स्टेशन व मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या झोन १ च्या पथकाने संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत स्पा सेंटरचे २ मॅनेजर अटकेत असून ४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
या प्रकरणात स्पा सेंटरचे ३ चालक/मालक फरार असून पोलिसांनी त्यांना फरार घोषित केले आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे झोन १ चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण (IPS) यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. यानंतर काशीमीरा पोलिस स्टेशनचे PI शीतल मुंडे मॅडम, PSI अजय मांडोले, DCP कार्यालयाच्या पथकाने बनावट ग्राहक आणि पंचासह नेचरल थाई स्पा सेंटर वर छापा टाकला.त्यात स्पा सेंटरचे २ मॅनेजर यांना अटक करण्यात आली असून स्पा सेंटरचे चालक/मालक यांना फरार घोषित करण्यात आले आहे.
पीडित महिला ४ महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना कांदिवली येथील रेस्क्यू फाउंडेशन येथे हलविण्यात आले.
पोलिसांनी या प्रकरणी BNS 143(1), 143(3), 3(5) आणि PITA ACT अंतर्गत कलम 3, 4, 5, 7 नुसार गुन्हा दाखल केला असून अटक आरोपींवर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. फरार आरोपींचा काशीमीरा पोलिसांचे विशेष पथक शोध घेत आहे.
‘नेचरल थाई स्पा सेंटर’मध्ये मागील २-३ वर्षांपासून चालणाऱ्या देहव्यापाराच्या रॅकेटचा तपास सुरू असून, यात आणखी किती मुलींना यात ढकलण्यात आले हे शोधणे बाकी आहे. या व्यवसायामागे कोणते मोठे रॅकेट आहे का याचीही चौकशी पोलिस करत आहेत.
ही कारवाई मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, झोन १ चे DCP राहुल चव्हाण (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली, काशीमीरा पोलिस स्टेशन व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने पार पाडली.